दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागात असणाऱ्या कोलोंबिया देशात भूकंपांचा विध्वंस पाहायला मिळाला. हा भूकंप एवढा मोठा आहे की, या भीषण भूकंपामुळे कोलंबियातील नागरिकांना 1999 मधील कॉफी प्रदेशातील भूकंपाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. कारण, त्यावेळी भूकंपात तब्बल 1,185 जणांचा मृत्यू, तर 8,500 हून अधिक लोक जखमी झाले होते. काल पुन्हा 27 वर्षांनी कोलोंबियात 7.4 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला. ज्यात इथल्या मोठ मोठ्या इमारती पत्त्त्याप्रमाणे हेलकावे खावून अवघ्या काही क्षणात कोसळल्यात. हा भूकंप जेव्हा आला आणि त्याचे हादरे इथल्या शहरांना बसले तेव्हा काही कळायच्या यात सगळीकडे विध्वंस झालाय. हेलकावे खावून कोसळणाऱ्या इमारती, नागरिकांचा आक्रोश आणि सगळीकडे आरडाओरड असं सगळं चित्र या भूकंपात पाहायला मिळालं आहे. नागरिकांनी मिळेल तिथे थांबून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र अनेकांचा हा प्रयत्न असफल झाला आणि त्यांना आपला जीव गमवावा लागलाय. मंडळी, कोलोंबियातील या भूकंपात आतापर्यंत जवळपास दिडशे नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर, किती इमारती कोसळल्या, किती भयानक नुकसान झालं याचा आत्ताच अंदाज बांधणं देखील कठीण आहे एवढं सगळं भीषण चित्र आहे. दरम्यान या भूकंपामागे सर्वात महत्त्वाचं असं ‘रिंग ऑफ फायर’हे कारण असल्याचं समजतंय. तेव्हा हा विषय नेमका काय आहे, कोलोंबियात आलेला भूकंपानंतर सध्या काय परिस्थिती आहे, भूकंपाचा केंद्रबिंदु कुठे होता, पूर्णपणे कोसळलेल्या इमारतींचा आकडा किती आहे, किती नागरिक गंभीर जखमी झालेत, देशाचं किती मोठ्या प्रणाणात नुकसान झालंय आणि जगाच्या पाठीवर कोलोंबियातील हा भूकंप किती मोठा होता हेच आपण सविस्तर पाहणार आहोत.#ColombiaEarthquake #ColombiaEarthquakeNews #Earthquake #EarthquakeNews #Magnitude74 #Earthquake2026 #ColombiaNews #SouthAmericaEarthquake #MajorEarthquake #EarthquakeDestruction #EarthquakeDamage #EarthquakeUpdate #RingOfFire #EarthquakeDeaths #EarthquakeCasualties #EarthquakeAftermath #EarthquakeRescue #SeismicActivity #BreakingNews #NaturalDisasterA powerful 7.4-magnitude earthquake struck Colombia, bringing back memories of the deadly 1999 Coffee Region earthquake that killed 1,185 people and injured more than 8,500. The latest quake caused buildings to collapse, triggering panic and widespread destruction. Around 150 deaths are feared, with casualties and damage expected to rise as rescue operations continue. So, what caused this massive earthquake? Where was its epicentre, how many buildings collapsed, how many people were injured, and how severe was the destruction? We’ll explain everything in detail.