इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज घटले:आदित्य ठाकरेंचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र; '100% शुद्ध पेट्रोलचा' पर्याय देण्याची मागणी
पेट्रोलमधील इथेनॉलच्या वाढत्या मिश्रणामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारींवरून संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. युट्यूबर्स, सोशल मीडियावरील मिम्स आणि नेटीझन्सकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टार्गेट केले जात असताना, आता या वादात राजकीय ठिणगी पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी…
