राष्ट्रवादी शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांशी भेट:पुणे शहरातील गुन्हेगारी, वाहतूक प्रश्नांवर सविस्तर चर्चा
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. सुमारे ६५ मिनिटे चाललेल्या या बैठकीत शहरातील सुरक्षाव्यवस्था, पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाया आणि वाहतूक नियोजनासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारीला आळा…
