नाशिक 5 दिवसांत खड्डेमुक्त करणार!:बनावट वर्कऑर्डर प्रकरणात माझाच दूरचा नातेवाईक दोषी, त्यालाही सोडणार नाही – गिरीश महाजन
नाशिक शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि आगामी कुंभमेळ्याच्या नावाने कोट्यवधी रुपयांची बोगस वर्कऑर्डर देण्याच्या मोठ्या घोटाळ्यावर राज्याचे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रोखठोक उत्तरे दिली आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, बनावट वर्कऑर्डर घोटाळ्यातील मुख्य आरोपी हा त्यांचा दूरचा नातेवाईक असला, तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी स्वतःच…
