सिराजने सलग तीन षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला:वॉर्मअप सामन्यात श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला; गिलच्या 44 धावा
भारताने कसोटी मालिकेपूर्वीच्या सराव सामन्यात श्रीलंका-11 ला 6 गडी राखून हरवले. मोहम्मद सिराजने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. कोलंबोमध्ये सामन्याच्या शेवटच्या दिवशी, रविवारचा खेळ संपण्यापूर्वी भारताला विजयासाठी 16 धावांची गरज होती. अशा स्थितीत सिराजने केशरा नुवंथाच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारले. मात्र, भारताच्या विजयानंतरही खेळ सुरू…
