मालवण–धामापूर–कुडाळ बसफेरी बंद; प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल
मालवण : मालवण आगारातून नियमितपणे सुरू असलेली मालवण–धामापूर मार्गे कुडाळ (रेल्वे स्टेशन) ही सकाळची बसफेरी काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील प्रवासी व विद्यार्थी वर्गाला मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या बसफेरीला चांगले भारमान मिळत असतानाही सेवा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मालवण आगारातून दररोज सकाळी १०.३० वाजता ही बस…
