Headlines

हिंगोलीत जिल्हा परिषद मैदानाजवळ पोलिसांची कारवाई:1.5 किलो गांजा अन् कारसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत




हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानाजवळ शहर पोलिसांच्या पथकाने दीड किलो गांजासह 3.03 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी सोमवारी ता. 10 सकाळी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची अधिक चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंगोली शहरासह जिल्हाभरातील अवैध व्यवसायावर छापा सत्र सुरु करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथके कार्यरत आहेत. या पथकाकडून दररोज अवैध व्यवसायाची माहिती घेऊन छापे टाकले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने मटका, जुगार अड्डे, गुटखा, बेकायदेशीर दारु विक्रीचा समावेश आहे. दरम्यान, शहरातील जिल्हा परिषद मैदानाजवळ असलेल्या एका कारमध्ये दोघांनी गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार गणेश लेकुळे, अशोक धामणे, शेख आवेज, दिलीप लेकुळे, सुनील अंभोरे, बोथीकर, डवले यांच्या पथकाने सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद मैदानाजवळ जाऊन पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी एक कार आढळून आली. पोलिसांनी कारमधील ओम पवार, शेख तौफीक यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर संशयावरून पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये दीड किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, कार, दोन मोबाईल असा 3.03 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक मस्के यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, त्यांनी गांजा कोणाकडून आणला होता तसेच विक्रीसाठी कोठे नेला जात होता याची चौकशी सुरु केली आहे. उपनिरीक्षक साखरे पुढील तपास करीत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत