आ. सावरकरांच्या पाठपुराव्याला यश:शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, महात्मा फुले योजनेतील 50 हजारांची जाचक अट रद्दची केली होती मागणी
अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कळीचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिल्याने, अकोला जिल्ह्यातील व राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सावरकर यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची मर्यादा ५० हजार रुपयांवरून दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तब्बल ६३ लाख शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा…
