Headlines

RBI Rate Hike Expectations; दरवाढीसाठी सज्ज व्हा! महागाईच्या सावटात गृहकर्जाचा EMI महागणार; RBI कडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता


Interest Rate Hike Update: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुढील काही काळासाठी व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याची शक्यता आहे. तुम्ही होम लोन, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वाढत्या महागाईच्या आघाडीवर सध्या तरी दिलासादायक चित्र पाहायला मिळत असून रिझर्व्ह बँकेकडूनही व्याजदरात बदल करणे अपेक्षित नाही. म्हणजे पुढील काही महिने तुमच्या EMI वर अतिरिक्त कोणताही बोजा वाढणार नाही, पण हा दिलासा कायम टिकून राहणार नाही.

वर्षाअखेरीस फुटणार व्याजदर वाढीचा बॉम्ब

जागतिक ब्रोकरेज फर्म BofA सिक्युरिटीजने अलीकडेच एक अहवाल जारी केला ज्यामध्ये म्हटले आहे की, येत्या काळात महागाईच्या चिंतेत भर पडली, विशेषतः अन्नपदार्थ महाग झाले, तर आरबीआय डिसेंबर 2026 पासून व्याजदरात एकूण 50 बेस पॉइंट्सने वाढ करू शकते.

Maharashtra TimesStock Market Today: वीकेंडच्या तोंडावर शेअर बाजारात तेजी परतली, गुंतवणूकदार एकाच दिवसात 5 लाख कोटींनी श्रीमंत; जाणून घ्या यामागील कारणे
BofA सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, याआधी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर जागतिक भू-राजकीय तणाव सर्वात मोठा मुद्दा होता, पण आता हवामान आणि मान्सून यांसारखे देशांतर्गत हालचाली महत्त्वाचे घटक बनले असून भविष्यात आरबीआयचे मौद्रिक धोरण ठरवण्यात या घटकांची निर्णायक भूमिका असेल.

या वर्षी किंवा पुढील वर्षी कमी पाऊस पडल्यास पिकांचे उत्पादन कमी होईल आणि या घटलेल्या उत्पादनाचा भाजीपाला, कडधान्ये, धान्ये आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतीवर थेट परिणाम होईल. यामुळे महागाई वाढू शकते परिणामी रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढवणे भाग पडू शकते.

Maharashtra TimesStock Market Today: वीकेंडच्या तोंडावर शेअर बाजारात तेजी परतली, गुंतवणूकदार एकाच दिवसात 5 लाख कोटींनी श्रीमंत; जाणून घ्या यामागील कारणे

El Niño का बनतेय चिंतेचे कारण?

BofA सिक्युरिटीजने आपल्या अहवालात पुढे अल निनोचा देखील उल्लेख केला, जी एक हवामानाची स्थिती आहे ज्यामुळे भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. असं झाल्यास थेट शेतीवर परिणाम होईल. शेती कमी झाल्यास बाजारात कमी मालाचा पुरवठा होईल आणि किमती वाढतील.

म्हणूनच अहवालात BofA ने 2027 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत अन्नधान्याच्या किमती अधिक महाग होण्याचा अंदाज वर्तवला आहे, ज्याचा ग्रामीण उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.

Maharashtra TimesPF Interest Credit: 10 लाख, 50 लाख असो वा 1 कोटी, तुमच्या EPF खात्यात व्याजाचे किती रुपये येतील? जाणून घ्या संपूर्ण गणित

महागाई सध्या नियंत्रणात

अहवालात पुढे संपूर्ण आर्थिक वर्ष 2027 साठी महागाई सुमारे 4.8% राहण्याचा अंदाज वर्तवला असून यानुसार सध्या परिस्थिती गंभीर दिसत नाही. मात्र पाऊस कमी राहिला, तर वर्षाच्या अखेरीस अन्नधान्याच्या किमती झपाट्याने वाढू शकतात.

दुसरीकडे, भारताकडे धान्याचा मोठा साठा असल्याचेही अहवालात स्पष्ट सांगितले आहे, जी भारताची एक मोठी ताकद आहे. याशिवाय, जागतिक कच्च्या मालाच्या किमतीही पूर्वीपेक्षा कमी असल्यामुळे हवामान थोडे खराब राहिले तरी, देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

सर्वसामान्य माणसावर याचा काय परिणाम होईल?

डिसेंबर 2026 मध्ये व्याजदर वाढले बँका आणि एनबीएफसींना निधी उभारण्यासाठी अधिक खर्च करावा लागेल. परिणामी, कर्ज देण्याबाबत काळजीपूर्वक विचार करावा लागेल आणि ज्यांना कर्ज दिले जात आहे त्याच्याकडून वेळेवर परतफेड केली जाईल याची खात्री करावी लागेल.

अशा परिस्थितीत, तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, सध्यातरी काळजी करण्याची गरज नाही. पण, भविष्यात महागाई वाढली आणि रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले तर सर्व प्रकारची कर्जे महागतील ज्यामुळे सर्वसामान्यांना जास्त खर्च करावा लागेल. दुसरीकडे, देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहिली तर रोजगार, व्यवसाय आणि उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत