शुभांगी देशपांडे, अनुराधा काळे यांना आगरकर, दाभोलकर पुरस्कार:महाराष्ट्र अंधश्रद्धेत चाचपडतोय, प्रा. मिलिंद जोशी यांचे प्रतिपादन
पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शुभांगी देशपांडे यांना आगरकर स्मृती पुरस्काराने, तर अनुराधा काळे यांना डॉ. दाभोलकर कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी चिंता व्यक्त केली की, आगरकर-दाभोलकरांचा महाराष्ट्र सध्या अंधारात चाचपडत आहे. प्रा. जोशी म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात बुवाबाजी वाढली असून बुद्धीप्रामाण्यवादाची उपेक्षा होत…
