Headlines

टीम इंडियाची कामगिरी अत्यंत सुमार आणि दर्जाहीन! इंग्लंडविरुद्ध संघाचा धूर निघाल्यानंतर भारताच्या माजी विकेटकीपरने गंभीर-श्रेयसला सुनावलं


India vs England T20 4-0 defeat : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर टीम इंडियाबाबत माजी क्रिकेटपटूने केलेलं विधान चर्चेत आहे. श्रेयस अय्यर, गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाबद्दल त्यांनी नेमकं काय म्हटलं, जाणून घ्या.

Deep dasgupta slams shreyas iyer gautam gambhir
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या ५ मॅचेसच्या टी२० सीरिजमध्ये ४-० अशा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमच्या कामगिरीवर आता चौफेर टीका होऊ लागलीये. भारताचे माजी विकेटकीपर-बॅट्समन दीप दासगुप्ता यांनी इंग्लंडच्या रणनीतीचे कौतुक केले असले, तरी टीम इंडियाच्या फ्लॉप शोवर आणि व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयांवर कडाडून हल्ला चढवला आहे. मार्च मध्ये टी२० वर्ल्ड कप जिंकल्यापासून भारतीय टीमचा ग्राफ वेगाने खाली घसरला असून संघाने गेल्या ७ पैकी तब्बल ६ सामने गमावले आहेत.

कॅप्टन अय्यर आणि गंभीरचा गेम फसला

दीप दासगुप्ता यांनी थेट कॅप्टन श्रेयस अय्यर आणि मुख्य कोच गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, “या सीरिजमध्ये इंग्लंड रणनीतीच्या बाबतीत आमच्या खूप पुढे होता. भारतीय टीमच्या काही योजना आणि निर्णय मला अजिबात समजले नाहीत. मैदानावरील टीम इंडियाची कामगिरी अत्यंत सुमार आणि दर्जाहीन होती. मग ती कॅचिंग असो किंवा आउटफिल्डमधील फील्डिंग. भारतासाठी ही विसरण्यासारखी सीरिज आहे, पण खेळाडूंना यातून धडा घ्यावा लागेल. संघात अनुभवाची प्रचंड कमतरता स्पष्ट जाणवली.”

Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi Video : प्लेइंग 11 मधून वगळताच 15 वर्षीय वैभवला अश्रू अनावर; खांद्यावर हात ठेवून कोणी दिला धीर?

३ खेळाडूंचे डेब्यू, पण सीरिजमधून काहीच साध्य नाही

या ५ मॅचेसच्या सीरिजमध्ये भारतीय टीमने वैभव सूर्यवंशी, प्रिंस यादव आणि सूर्यांश शेडगे या तीन युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली. मात्र, एवढं करूनही भारताच्या पदरात काहीच पडले नसल्याचे दासगुप्तांचे म्हणणे आहे. तो म्हणाला, “एक-दोन इनिंग्सचा अपवाद वगळता, भविष्याच्या दृष्टीने या सीरिजमधून भारतासाठी काहीच पॉझिटिव्ह गोष्टी समोर आलेल्या नाहीत. हे अत्यंत निराशाजनक प्रदर्शन होते आणि आता सिलेक्टर्सना पुन्हा नव्याने प्लॅनिंग करावे लागेल.”

दीप दासगुप्ता यांनी जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत भारतीय बॉलिंगमधील कमकुवतपणा उघड केला. सीनियर बॉलर अर्शदीप सिंहच्या नेतृत्वाखालील या बॉलिंग लाईनअपला मिडल ओव्हर्समध्ये विकेट्स घेण्यात पूर्णपणे अपयश आले. भारताकडे बुमराहसारखा जागतिक दर्जाचा बॉलर असला, तरी मिडल ओव्हर्समध्ये पार्टनरशिप तोडणारे दर्जेदार बॉलर्स शोधणे आता गरजेचे झाले आहे.

आता २०२७ च्या ५० ओव्हर वर्ल्ड कपवर लक्ष

या पराभवामागे टीम मॅनेजमेंटचा एक वेगळा विचारही असू शकतो, असा अंदाज दासगुप्ता यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “पुढच्या वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये ५० ओव्हर्सचा वनडे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यामुळे कदाचित भारतीय संघ व्यवस्थापनाने सध्या त्या फॉरमॅटला जास्त प्राधान्य दिले असावे आणि टी२० मध्ये नवीन प्रयोग केले असावेत. भारताकडे टॅलेंटची कमी नाही, पण या तरुण खेळाडूंना परदेशातील कठीण परिस्थितीचा अनुभव मिळणे गरजेचे आहे, जेणेकरून ते आपल्या चुकांमधून शिकतील.”

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा