मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस, मेघा नदीला पूर:शिरसगाव कसबा आणि ब्राम्हणवाडा येथील पूर्णा नदीही दुथडी भरून वाहतेय
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील बैतुल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा गावाजवळून वाहणारी मेघा नदी आणि ब्राम्हणवाडा थडी गावातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शिरसगाव कसबा परिसरात काहीशी चिंतेची स्थिती होती. नदीकाठावर आणि आसपासच्या…
