Kalamba Lake | कळंबा तलाव धोक्यात? संरक्षण भिंतीला तडे, महापालिकेत गाजला मुद्दा
कळंबा : कळंबा गावसह कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी असलेल्या ऐतिहासिक कळंबा तलावाच्या संरक्षणाचा प्रश्न महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऐरणीवर आला. दैनिक तरुण भारतने प्रसिद्ध केलेल्या कळंबा तलावाच्या संरक्षण भिंतीवरील तडे, तलावाच्या भरावाची धोकादायक अवस्था आणि संवर्धनाच्या गरजेबाबतच्या वृत्ताची दखल घेत नगरसेविका स्नेहा तेंडुलकर यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला. रंकाळा तलावाप्रमाणेच कळंबा तलावाचेही संवर्धन, सुशोभीकरण आणि जतनामी…
