Headlines

तुकाराम मुंढेंनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हाती घेतली खास मोहीम, थेट शाळांमध्ये धडकणार – tukaram mundhe launches food safety campaign in schools


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दुधाच्या भेसळीवरील धडक मोहिम सुरु राज्यभर सुरु असताना तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा आता शाळा आणि कॅन्टीनकडे वळवला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही असा थेट इशाराच देण्यात आला आहे. राज्यातील जनतेच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोराविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने सध्या तीव्र मोहीम हाती घेतली आहे. धडक आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने राज्यात दुधासह इतर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी मोठे धाडसत्र सुरू केले होते. हे धाडसत्र सुरू असतानाच, आता एफडीएने आपला मोर्चा थेट शाळा आणि शालेय कॅन्टीनकडे वळवला आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं नेमकी हाती घेतलेली मोहिम नेमकी काय आहे, या संपूर्ण मोहिमेची पार्श्वभूमी, मुंबईत झालेली महत्त्वाची बैठक, शाळांना दिलेले निर्देश आणि लहान मुलांच्या पोषण आहाराबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट करणारा हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पाहा..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत