Headlines

हिंदी चित्रपटांना टक्कर, डोक्याचा भुगा करणारा मराठी सिनेमा ‘बोल बोल राणी’ चा ट्रेलर, सई ताम्हणकरच्या भूमिकेची उत्सुकता


Bol Bol Rani Trailer : मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्य दमदार असे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता एका क्राइम थ्रीलर सिनेमाची चर्चा सुरू आहे. ‘बोल बोल राणी’ असं सिनेमाचं नाव आहे.

Bol Bol Rani Trailer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: सई ताम्हणकर , चिन्मय मांडलेकर आणि सुबोध भावे यांच्या भूमिका असलेला ‘ बोल बोल राणी ’ सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमाचा ट्रेलर समोर आलाय.

सई ताम्हणकरच्या चाहत्यांना सध्या ती एकामागून एक सरप्राइज देताना दिसतेय. बॅक टू बॅक हटके भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी सई या सिनेमात वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये तिची भूमिका न सुटणारं कोडं असल्याचं पाहायला मिळतंय.

प्रत्येक क्षणात सईच्या भूमिकेची बदलणारी छटा

अपहरण, खून, संशय आणि एकामागून एक उलगडत जाणारी रहस्ये…प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करणारा आगामी मराठी चित्रपट ‘बोल बोल राणी’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर उत्सुकता निर्माण करणारा आहे.

प्रत्येक फ्रेममध्ये वाढणारा थरार, वेगवान घडामोडी आणि प्रत्येक क्षणात सईची बदलणारी छटा, अधिक गडद होत जाणारं रहस्य यामुळे हा ट्रेलर प्रेक्षकांना विचार करायलाही भाग पाडतोय.

ट्रेलरमध्ये दिसते की या चित्रपटात सई ताम्हणकर एका वेगळ्या व रहस्यमय भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाची कथा तिच्या पात्राभोवती फिरत असल्याची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागचं सत्य नेमकं काय आहे? ती या रहस्याची बळी आहे की सूत्रधार? तिच्या प्रत्येक भावामागे आणि प्रत्येक संवादामागे अनेक प्रश्न दडलेले असल्यानं तिचं पात्र चित्रपटातील सर्वात मोठं कोडं ठरणार असल्याची उत्सुकता ट्रेलर निर्माण करतो.

Maharashtra TimesVanita Kharat: घर घेतल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात आणि पती सुमितच्या आयुष्यात आणखी एक आनंद, जवळच्या मित्रमंडळींसोबत केलं सेलिब्रेशन
केवळ सईचीच नव्हे, तर सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या व्यक्तिरेखाही तितक्याच गूढ आणि संशयास्पद वाटतात. प्रत्येक जण काहीतरी लपवत असल्याची भावना ट्रेलरमधून सतत जाणवते. ते या रहस्याचा उलगडा करणारे आहेत, की स्वतःच या गूढ घटनांमध्ये अडकलेले आहेत? ते सईच्या आयुष्यातील घटनांचे साक्षीदार आहेत, सूत्रधार आहेत की, या सगळ्याचे बळी ठरणार आहेत? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटातच मिळणार असल्याची उत्सुकता ट्रेलर निर्माण करतो.

प्रत्येक पात्रावर संशय येतो, प्रत्येक प्रसंग नवा धक्का देतो आणि प्रत्येक ट्विस्टसोबत प्रेक्षकांचा अंदाज चुकीचा ठरतो. त्यामुळे ‘बोल बोल राणी’ हा प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा एक चित्रपट ठरणार आहे.

Maharashtra TimesNational Doctors day : दवाखाने आणि त्यांची डॉक्टरकी, ‘आय अ‍ॅम सॉरी’ एवढंच बोलायचं अन्.. , छोट्या पडद्यावरच्या वैद्यकीय विश्वाच्या काही रंजक गोष्टी

दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणाले, ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरमधून आम्ही रहस्याची एक छोटीशी झलक दाखवली आहे. या चित्रपटात प्रत्येक पात्राचं एक गुपित आहे आणि प्रत्येक ट्विस्ट प्रेक्षकांच्या अपेक्षांपेक्षा वेगळा आहे. विशेषतः सई ताम्हणकरने साकारलेली व्यक्तिरेखा तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तिच्या पात्राभोवती उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना प्रत्येक क्षणी नवा धक्का देईल.”

केव्हा प्रदर्शित होणार ‘बोल बोल राणी’ सिनेमा?

‘बोल बोल राणी’ हा रहस्य, थरार आणि सस्पेन्सने भरलेला चित्रपट १७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा