मुंबई: गेल्या तीन -चार वर्षांपासून नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ सिनेमाची चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी एक पोस्टरही समोर आलं होतं. अखेर आता सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
फॅन्ड्री आणि ‘सैराट‘ सारख्या राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘खाशाबा’ची घोषणा केली होती.
चित्रपटगृहांमध्ये प्रथम प्रदर्शित झालेल्या खाशाबा च्या टीझरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. आता तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसवर रिलीज करण्यात आला आहे. पहिल्या टीझरमध्ये लाल मातीली कुस्ती आणि खाशाबांच्या वाट्याला आलेल्या संघर्षाची झलक दिसतेय. सिनेमातील सेट्स, लोकेशन्स तसंच कलाकरांची निवड लक्ष वेधी आहे. हे असलं तरी, सिनेमात खाशाबांच्या भूमिकेत कोण ? या प्रश्नाचं उत्तर मात्र प्रेक्षकांना मिळालं नाहीये.
इथे पाहा टीझर ‘धुरंधर’, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आणि ‘राजा शिवाजी’ यासारख्या सिनेमाची निर्मिती केल्यानंतर जिओ स्टुडिओजनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. अजय-अतुल यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. खाशाबा यांच्या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली असून, त्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. या नवोदित कलाकारासोबत त्याबरोबरच जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम, आणि गार्गी कुलकर्णी यांसारख्या एकापेक्षा एक दमदार कलाकारांच्या सिनेमात भूमिका आहेत.
केव्हा प्रदर्शित होणार सिनेमा? ‘खाशाबा’ १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अशी झाली खाशाबांची निवड तर या सिनेमासाठी नागराज यांनी नवीन चेहरा हवा होता,त्यांनी महाराष्ट्रभर ऑडिशन घेत या अभिनेत्याची निवड केली आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा