Headlines

सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नात पवारांच्या सुनेची चर्चा, तनिष्का पवारचा पिंक साडीतील लुकने वेधले लक्ष – tanishka pawar pink saree look at supriya sule daughter wedding


सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या भव्य लग्नसोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत फॅशनचीही खास चर्चा रंगली. यावेळी पवार कुटुंबाची सून तनिष्का पवार हिने गुलाबी रंगाच्या आकर्षक साडीत हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साधेपणा, एलिगन्स आणि पारंपरिक सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असलेल्या तिच्या लुकचे सोशल मीडियावरही मोठे कौतुक होत आहे.

tanishka pawar pink saree look at wedding
tanishka pawar pink saree look at wedding
राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या भव्य विवाहसोहळ्यात अनेक पाहुण्यांनी आपल्या आकर्षक आणि पारंपरिक पोशाखांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, या सगळ्यांमध्ये पवार कुटुंबाची सून तनिष्का पवार हिचा पिंक साडीतील मोहक लुक विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या साध्या पण एलिगंट स्टाईलने सोशल मीडियावरही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. लग्नसोहळा म्हटला की फॅशन,रंपरा आणि ग्लॅमर यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या विवाहातही हेच चित्र दिसून आले. अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात तनिष्का पवारने आपल्या पारंपरिक लुकमुळे वेगळी छाप पाडली. (फोटो सौजन्य :- @tanishkaypawar)

पिंक साडीतील देखणा आणि रॉयल अंदाज

पिंक साडीतील देखणा आणि रॉयल अंदाज

तनिष्का पवारने या खास प्रसंगासाठी चमकदार गुलाबी रंगाची सुंदर सिल्क साडी परिधान केली होती. या साडीवर सोनेरी धाग्यांनी केलेले नाजूक डिझाईन आणि आकर्षक बॉर्डर तिच्या लुकमध्ये अधिक भर घालत होते. साडीचा रंग उत्सवी वातावरणाशी सुसंगत असून तिच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक खुलवत होता. गुलाबी रंग भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये आनंद, प्रेम आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. तनिष्काने निवडलेली ही साडी पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचाही स्पर्श देणारी होती. त्यामुळे तिचा संपूर्ण लुक अत्यंत उठावदार दिसत होता.

दागिन्यांची निवडही ठरली खास

दागिन्यांची निवडही ठरली खास

साडीसोबत तनिष्काने जड दागिन्यांऐवजी एलिगंट ज्वेलरीची निवड केली होती. गळ्यात आकर्षक नेकलेस, कानात झुमके आणि हातात साध्या बांगड्या असा तिचा दागिन्यांचा साज होता. या दागिन्यांमुळे तिच्या लुकला एक रॉयल टच मिळाला. विशेष म्हणजे, तिच्या ज्वेलरीची निवड साडीशी अगदी समतोल साधणारी होती. अनेकदा जास्त दागिने परिधान केल्याने संपूर्ण लुक ओव्हर दिसतो.

नॅचरल मेकअपने वाढवले सौंदर्य

नॅचरल मेकअपने वाढवले सौंदर्य

आजकालच्या ट्रेंडनुसार तनिष्काने अतिशय हलका आणि नैसर्गिक मेकअप केला होता. न्यूड टोन मेकअप, हलकी आय मेकअप स्टाईल आणि सॉफ्ट पिंक लिपस्टिकमुळे तिचा चेहरा अधिक खुलून दिसत होता. मेकअपमध्ये साधेपणा ठेवत तिने आपले नैसर्गिक सौंदर्य अधोरेखित केले. त्यामुळे तिचा लुक अतिशय फ्रेश आणि क्लासी वाटत होता.

हेअरस्टाईलनेही जिंकली मने

हेअरस्टाईलनेही जिंकली मने

तनिष्काच्या संपूर्ण लुकमध्ये तिची हेअरस्टाईलही तितकीच आकर्षक होती. मध्यभागी भांग पाडून हलक्या वेव्ही लुकमध्ये बांधलेले केस तिच्या पारंपरिक पोशाखाला उत्तम प्रकारे पूरक ठरत होते.अतिशय गुंतागुंतीची हेअरस्टाईल न निवडता साधेपणावर भर देण्यात आला होता.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय

सोशल मीडियावर चर्चेचा विषय

लग्नसोहळ्यातील तनिष्का पवारचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिच्या लुकचे भरभरून कौतुक केले. अनेकांनी तिच्या साडीची निवड, दागिने आणि साधेपणातील सौंदर्य यांचे विशेष कौतुक केले.फॅशनप्रेमींनी तिच्या या लुकला “परफेक्ट वेडिंग गेस्ट लुक” असे संबोधले.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा