NMIA Water Leak Video: काही दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळावर पाणीगळती होत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक दावे केले जात होते. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीगळती झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विमानतळाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, या प्रकरणावर विमानतळ प्रशासनाने स्पष्टीकरण देत दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर आक्षेप नोंदविला आहे.
पाणीगळती कशामुळे झाली?
या गळतीमुळे प्रवाशांच्या बॅगा भिजल्याचा दावा करण्यात आला. मात्र, ‘१७ जून रोजी बॅगेज बेल्ट क्रमांक ५ आणि ६जवळ किरकोळ पाणीगळती आढळून आली. ही बाब निदर्शनास येताच संबंधित यंत्रणांनी गळती नियंत्रणात आणली. संबंधित परिसर त्वरित बंद करण्यात आला आणि बॅगेज हाताळणीचे काम पर्यायी बेल्टवर वळविण्यात आले. विमानतळावरील कामकाजावर परिणाम झाला नाही’, अशी माहिती व्यवस्थापनाने दिली. ‘ही समस्या अर्ध्या तासात दूर करण्यात आली’, असेही व्यवस्थापनाने म्हटले आहे.
विमानतळासाठी १९ हजार कोटींचा
डिसेंबर 2025मध्ये नवी मुंबई विमानतळाचं मोठ्या थाटमाटात उद्घाटन करण्यात आलं. आता लवकरच विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांनाही सुरूवात होणार आहे. तब्बल १९ हजार कोटींचा खर्च करून उभारलेल्या विमानतळावर काहीच महिन्यात पाणीगळती सुरू झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर विमानतळाने आपलं उत्तर स्पष्ट केलं. या व्हायरल व्हिडीओमध्ये विमानतळावर बॅगेज कन्व्हेयर बेल्टवर पाणी गळताना दिसून येत आहे.
विमानतळाच्या इमारतीमध्ये कोणताही दोष नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. विमानतळाची छत आणि भींतींची गुणवत्ता आणि बांधकामामध्ये कोणताही दोषनसून एसीमधील अनेपक्षित बिघाडामुळे पाणीगळती झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यानंतर तातडीने दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं असून विमानतळावरील कोणत्याही सेवांमध्ये व्यत्यय न आणता समस्या सोडवण्यात आली होती.
पण विमानतळावरील सर्व वातानुकूलित यंत्रणा फक्त सहा महिने जुन्या असून इतक्या लवकर तांत्रिक बिघाड कसा झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येत्या १५ जुलैपासून विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरूवात झाली की प्रवाशांची संख्या वाढणार. जगभरातून प्रवासी विमानतळावर दाखल होणार. यावेळी असे तांत्रिक बिघाड होणार नाहीत अशी आशा व्यक्त केली जात आहे. यावेळी सर्व प्रथम मालवाहू उड्डाणांना सुरुवात होणार असून 18 साप्ताहिक उड्डाणे हाताळली जातील. प्रवासी उड्डाणं सुरू करण्यासाठीही सध्या हालचाली सुरू आहेत.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा