Headlines

वाटाघाटींचे समीकरण; जिल्हा बँकेचे अध्यक्षपद शिवसेनेला:शनिवारी दिवसभर शिवसेना-भाजपमध्ये खलबते; अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार



जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद कुणाला मिळावे, यासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात शनिवारी दिवसभर जोरदार रस्सीखेच व खलबते सुरू होती. अखेर अध्यक्षपदाचा पहिला मान शिवसेनेला देण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, दोन्ही पक्षांमध्ये दोन-दोन वर्षांचा सत्त

.

या बँकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच ओबीसी विकासमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक आमदार – खासदार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेची ठरली होती. महायुतीने ही निवडणूक एकत्र लढवली असली तरी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

शिवसेनेची आक्रमक भूमिका

महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतील सत्ता गमावल्यामुळे, या वेळी कुठल्याही परिस्थितीत बँकेचे अध्यक्षपद गमवायचे नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले. यासाठी शिवसेनेचे सर्व आमदार एकत्र आले होते. खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून पहिल्यांदा शिवसेनेचाच अध्यक्ष व्हावा, अशी आक्रमक भूमिका मांडण्यात आली, तर भाजपकडून मंत्री अतुल सावे पक्षाची बाजू मांडत होते.

अध्यक्षपद शिवसेनेला

“जागा जास्त असल्यामुळे स्थानिक पातळीवर सत्तेचे समीकरण तयार करून पहिल्यांदा शिवसेनेचाच अध्यक्ष होणार, असे ठरले आहे. हे स्थानिक समीकरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कळवण्यात येणार असून, निर्णय रविवारी होईल.” – संजय शिरसाट, पालकमंत्री

विलास भुमरेंचे नाव आघाडीवर

शिवसेनेकडून आमदार विलास भुमरे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. खासदार संदिपान भुमरे यांनी या निवडणुकीची संपूर्ण धुरा सांभाळली होती, तसेच मतदानाच्या वेळीही त्यांनी पूर्ण वेळ ठाण मांडले होते. दुसरीकडे, भाजपकडून ऐनवेळी धक्कादायक नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार किंवा मंत्र्यांऐवजी निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळावी, असा सूर भाजपच्या अंतर्गत गोटातून उमटत आहे.

संख्याबळ ठरले महत्त्वाचे

बँकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित येत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. अंतर्गत वाद टाळण्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे ९, भाजपचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, ठाकरे गटाचा १ आणि काँग्रेसचा १ उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचे संख्याबळ अध्यक्षपदासाठी महत्त्वाचे ठरले.

मुंबईतून अंतिम निर्णय

अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. रविवारी बँकेचा अध्यक्ष नेमका कोण असेल, हे स्पष्ट होईल. – अतुल सावे, ओबीसी विकासमंत्री

दोन वर्षांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा

स्थानिक पातळीवर झालेल्या चर्चेनुसार, पहिल्या टप्प्यात शिवसेनेचा अध्यक्ष, तर भाजपचा उपाध्यक्ष असणार आहे. या पाच वर्षांच्या कार्यकाळात दोन वर्षे शिवसेना, दोन वर्षे भाजप आणि एक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद देण्याच्या फॉर्म्युल्यावर स्थानिक नेत्यांमध्ये सहमती झाली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत