HRA Rules : गेल्या काही काळापासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याशी (HRA) नियमांविषयी वेगवेगळ्या चिंता व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे, विशेषतः केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सरकारी निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या पती-पत्नींमध्ये चिंता निर्माण झाली असून आता दिल्लीतील सरकारने या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संसदेत सरकारने सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA शी संबंधित धोरण बदलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आणि सध्याचे नियम लागू राहतील.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विविध सरकारी मुद्द्यांवर प्रश्न विचारले जात असताना 8 व्या वेतन आयोगाबाबत देशभरात चर्चा सुरू असून फिटमेंट फॅक्टर आणि HRA बाबत आयोगाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे, घरभाडे भत्त्याबाबत संसदेने सरकारकडे उत्तर मागितले.
सरकारी नोकरीतील जोडप्यांना HRA पात्रता नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिला असून जेव्हा पती-पत्नी दोघेही केंद्रीय सेवेत असतात आणि त्यांच्यापैकी एकाला शासकीय निवासस्थान दिले जाते, तेव्हा HRA साठी प्रस्थापित नियम लागू होतात. पण अलीकडे सरकार या नियमांचा आढावा घेणार आहे की नाही, यावर कामगार वर्गामध्ये चर्चा वाढत आहे. अशा अट्कळांमुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये मासिक भत्ता आणि आर्थिक नियोजनाबद्दल अनिश्चितता पाहायाला मिळाली.
राज्यसभा खासदार सुमित्रा बाल्मिकी यांनी अर्थ मंत्रालयाला प्रश्न विचारून सरकारी कर्मचारी जोडप्यांसाठी घरभाडे भत्ता कपातीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सरकारला विचारले, “पती-पत्नी दोघेही सरकारी कर्मचारी असतात आणि एकाच सरकारी निवासस्थानात राहतात, तेव्हा घरभाडे भत्ता कपातीच्या सध्याच्या धोरणामागे काय तर्क आहे?” “या धोरणावर पुनर्विचार करण्यासाठी कर्मचारी संघटना किंवा कर्मचाऱ्यांकडून सरकारला काही विनंत्या मिळाल्या आहेत का?” आणि कर्मचारी जोडप्यांसाठी हा नियम अधिक तर्कसंगत आणि न्याय्य बनवण्यासाठी सरकार आढावा घेणार आहे का?
म्हणजे पती-पत्नी सरकारी सेवेत असतील आणि एकाच ठिकाणी काम करत असतील व एका जोडीदाराला शासकीय घर मिळाले तरी संपूर्ण कुटुंब शासकीय घरासाठी पात्र मानले जाते. अशा प्रकरणांमध्ये दुसऱ्या जोडीदाराला घरासाठी कोणताही स्वतंत्र खर्च नसतो, त्यामुळे HRA लाभांसाठी अपात्र ठरतात.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा