Headlines

बेबी बॉस वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेला झोडलं,पठ्ठ्याचं शतक हुकलं, भारताकडून 193 धावांचे टार्गेट


IND vs ZIM 3rd T20 News : भारत आणि झिम्बाब्वेममध्ये तिसरा टी-२० सामना सुरू आहे . या सामन्यामध्ये भारताचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडले, आज सर्वांना थोडा वेगळा वैभव सूर्यवंशी पाहायला मिळाला. भारतान झिम्बाब्वेला 193 धावांचे टार्गेट दिले आहे.

Vaibhav Sooryavanshi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेममध्ये तिसरा आणि शेवटचा सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करत आहे. भारताचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी याने अर्धशतक केले आहे. या सामन्यामध्ये वैभवचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला असून पठ्ठ्याने मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले असून मैदानावर खेळत होता. वैभवने पहिल्या टी-२० सामन्यात अर्धशतक केले होते. त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये लवकर बाद झाला होता. आजच्या सामन्यामध्ये त्याने कमबॅक केल्याचं पाहायला मिळालं. वैभव ८१ धावांवर वैभव आऊट झाला त्यामुळे त्याचे शतक १९ धावांनी हुकले. भारताने २० ओव्हरमध्ये १९२-५ धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी १९३ धावांची गरज आहे.

वैभव सूर्यवंशी याने ३१ चेंडूत ५० धावा करताना त्यामध्ये त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. काल म्हणजेच शनिवारी सामना झाला होता. त्यानंतर २४ तासात पुन्हा तिथेच हा सामना होत आहे. त्यामुळे पिच थोडे स्लो झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पण पठ्ठ्याने आपल्या या खेळीमधून आक्रमकता आणि संयमीपणा दाखवत आपले अर्धशतक पूर्ण केले.
Maharashtra TimesHardik Pandya CSK Offer : हार्दिक पांड्यासाठी चेन्नईने लावली ताकद! 2 स्टार खेळाडूंसह 10 कोटीही देणार, पण मुंबई अडून बसलीय; एका अटीमुळे पेच
सामन्याच्या १० ओव्हर झाल्या त्यावेळी वैभवचे अर्धशतक पूर्ण झाले होते. त्यानंतरह मैदानावर तो नॉट आऊट होता, आज मिळालेल्या दमदार सुरूवातीनंतर तो शतकात रूपांतर करतो की सर्वांना पाहायचं होतं पण ८१ धावांवर असताना तो आऊट झाला. भारताकडून ईशान किशन २९ धावा, श्रेयस अय्यर २७ धावा आणि रिंकू सिंगने २५ धावा केल्या. पहिल्या टी-२- सामन्यामध्ये सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला होता.
Maharashtra TimesIND vs ZIM 2nd T20 : झिम्बाब्वेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय, भारतीय संघात एक बदल; वैभव-अभिषेक फोडून काढणार?

प्लेइंग ११ मध्ये दोन मोठे बदल

आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघामध्ये दोन महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले. यामधील एक म्हणजे प्रिन्स यादव आणि शिवम दुबे आजच्या सामन्यामध्ये खेळात नाहीयेत. त्या दोघांच्या जागेवर टीममध्ये आज अशोक शर्मा आणि सूर्यांश शेडगे यांना संधी मिळाली आहे. प्रिन्स यादव ह दुखापती आहे तर शिवमची तशी या मालिकेत फार काही गरज भासली नाही. त्यामुळे शेवटचा सामना असल्यामुळे सूर्यांशला संधी दिली गेली आहे.

भारत (प्लेइंग ११): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मयंक यादव, अशोक शर्मा