Headlines

फ्रान्समध्ये विमान अपघातात पायलटसह 11 जणांचा मृत्यू


स्कायडायव्हिंग स्कूलच्या विमानाला दुर्घटना

► वृत्तसंस्था

पॅरिस

फ्रान्समधील टॉम्ब्लेन शहरात रविवारी झालेल्या विमान अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. हे विमान एका पॅराशूटिंग स्कूलचे होते. या अपघातात पायलट व्यतिरिक्त पाच विद्यार्थी व पाच प्रशिक्षकांसह सर्व 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, कोणालाही वाचवता आले नाही. या घटनेनंतर फ्रान्सचे गृहमंत्री घटनास्थळी दाखल झाले होते.

पूर्व फ्रान्समधील नॅन्सी शहराजवळील टॉम्ब्लेन परिसरात रविवारी हा विमान अपघात झाला. विमानात पायलटसह अकरा जण होते. सर्वांचा मृत्यू झाला.  विमानातील सर्व प्रवासी स्कायडायव्हिंगच्या सहलीची योजना आखत होते. स्थानिक पोलिसांनी लोकांना टॉम्ब्लेन विमानतळ परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अपघातग्रस्त विमान पिलाटस पीसी-6 टर्बो पोर्टर वर्गातील होते. ते एका पॅराशूट प्रशिक्षण शाळेचे होते. अपघातप्रसंगी प्रशिक्षणासाठी एकूण अकरा जण विमानात होते. अपघातात ठार झालेल्यांमध्ये पाच प्रशिक्षक आणि पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे, म्हणजेच विमानात असलेले सर्वजण अपघातात मरण पावले. बचावकार्यासाठी रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस आणि विशेष बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली होती.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत