Headlines

पतीने पत्नीचा काटा काढला, सुपारी देऊन रचला अपघाताचा बनाव; पण भावाच्या एका संशयाने गूढ उकललं| Maharashtra Times


Buldhana Crime: काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाला होता. पण हा अपघाती मृत्यू नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात शिक्षिकेच्या पतीला अटक केली आहे.

buldhana crime news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमोल सराफ, बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील कवठळ नजीक झालेल्या 2 मार्च रोजी शिक्षक महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता. हा मृत्यू अपघाती नसून पत्नीचा सुपारी देऊन खून केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पतीसह धडक देणारा वाहन चालक या दोघांना अटक केली आहे. सध्या सुपारीसाठी मध्यस्थी करणाऱ्यास अटक करणे बाकी आहे. आरोपींना 7 मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता 9 मार्चपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे .

नेमकं काय घडलं?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक वृषाली प्रकाश गावंडे वय वर्ष 37 राहणार पातुर्डा या पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. वृषाली यांचे पती प्रकाश अनंत गावंडे यांच्यासह घरातल्यांसह सतत वाद होत असे. त्यामुळे मृतक शिक्षिकेने संग्रामपूर पोलीस स्टेशन मध्ये कौटुंबिक छळाची तक्रार सुद्धा दिली होती. परंतु त्यांनंतर त्यांचा मृत्यू झाला. 3 मार्च रोजी त्यां घटना घडल्यानंतर मृतक शिक्षकेचा भाऊ सुमित डोसे याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला.

Maharashtra TimesNagpur News: दोन वर्षांपूर्वी बाप हरपला, आता मायेचे छत्रही गेले; मुलांसाठी झिजणाऱ्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू

कसा झाला अपघात?

घटनेची पार्श्वभूमी पाहून जळगाव जामोद पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवत पती प्रकाश अनंत गावंडे वय वर्ष 37 राहणार पातुर्डा व टाटा छोटा हत्ती मालवाहू क्रमांक MH 28 BB 57 53 चा चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी यांनी मृतक वृषाली स्कूटर क्रमांक एम एच 28 एएल 58 15 ला मागून जोरदार धडक देऊन खून केल्याचे उघड केले. सदर प्रकरणात पती प्रकाश व त्याचा मित्र मंगेश चौहूलकर राहणार पातुर्डा यांनी मध्यस्थी करून वाहन चालक मनीष सूर्यवंशी याला एक लाख रुपयाची सुपारी देऊन सदर घटना घडवून आणली होती हे ही पोलिसांच्या तपासात समोर आले.

Maharashtra TimesAhilyanagar Crime : जामखेड कावेरी हॉटेल गोळीबार प्रकरण; 29 वर्षीय रोहित पवारवर जीवघेणा हल्ला, मुख्य सूत्रधाराला अटक

आरोपी विरुद्ध कलम 106 1 281 भारतीय न्याय संहिता सह कलम 134 177 मोटर वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे करीत आहेत.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा