Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:अहंकाराला निरोप म्हणजेच‎ जीवनातील सर्व सुखांचा मार्ग‎




स्वामी विवेकानंद आणि स्वामी रामतीर्थ यांना संपूर्ण जगात गौरव‎मिळाला. त्यांनाच स्वतःच्या देशात योग्य मान मिळाला नव्हता. ते दोघेही‎म्हणत असत की प्रशंसेचे प्रमाणपत्र घ्यायचे असेल तर परमेश्वराकडून‎घ्या; जग काय देणार? माणसाची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे‎अहंकार. या अहंकाराचे प्रशंसा हे अन्न आहे. अहंकारी व्यक्तीला सर्वत्र‎स्वतःची स्तुती व्हावी, स्वतःला मान मिळावा असे वाटते. माणसाची‎सर्वांत मोठी कमजोरी म्हणजे अहंकार. स्वतःबद्दलचा अति अभिमान‎त्याला वास्तवापासून दूर नेतो. माणूस स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजू‎लागतो. दुःखाचे एक अदृश्य कारण अहंकारही आहे. एक छोटा प्रयोग‎करून पाहा. मार्कर पेनने बर्फाच्या छोट्या तुकड्यावर ‘मी’ असे लिहा‎व थोडा वेळ पाहा. ते वितळेल, पुसले जाईल. आणखी एक प्रयोग‎श्वासाशी संबंधित आहे. डोळे बंद करा. भुवयांच्या मधोमध असलेल्या‎आज्ञाचक्रावर मन केंद्रित करा. ‘मी’ हा शब्द पाहा. मग दीर्घ श्वास घ्या‎व पुन्हा ‘मी’ हा शब्द पाहा. श्वास सोडताना त्या ‘मी’ला वितळताना‎पाहा. ही क्रिया तीन-चार वेळा करा. तुम्हाला जाणवेल की ‘मी’ पणा‎कमी होत आहे. ‘मी’ कमी होत जाईल. अहंकारही नाहीसा होईल.‎अहंकाराचा निरोप म्हणजेच जगातील सर्व सुखांचा मार्ग आहे.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत