Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:ईर्षा आणि तुलनासुद्धा ‎लाभदायक ठरू शकते‎




प्रत्येक माणसाच्या मनात कुठेतरी थोडीफार ईर्षा (असूया) असतेच.‎ईर्षेची सुरुवात होते ती तुलनेतून. ‘तुलना’ हा शब्द ‘तोलणे’ यावरून‎आला आहे. जेव्हा आपण तराजूच्या एका पारड्यात स्वतःला ठेवतो‎आणि दुसऱ्या पारड्यात इतरांना ठेवून वजन करतो त्यालाच तुलना‎म्हणतात. म्हणूनच जेव्हा आयुष्यात अशी तुलना करण्याची वेळ येईल‎तेव्हा ती केवळ एक जिज्ञासा म्हणून करा. आपण मागे का आहोत हे‎जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या तुलनेतून आपल्याला काय चांगले मिळू‎शकते याचा विचार करा. पण, जर आपण ईर्षा किंवा द्वेषाच्या गर्तेत‎अडकलो तर मात्र आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण‎ज्याच्याबद्दल मनात ईर्षा बाळगतो, त्याचे काहीच नुकसान होत नाही.‎उलट, आपलेच नुकसान होते. ईर्ष्या वाढल्यामुळे आपल्यात चिडचिड,‎अस्वस्थता आणि उदासीनता वाढू लागते. हा सगळा ईर्षेचाच परिणाम‎ असतो. आपल्या मनात ईर्षा आणि तुलना या गोष्टी येत असतील तर‎त्यांचा वापर अत्यंत सावधगिरीने केला पाहिजे. ज्या व्यक्तीबद्दल मनात‎ईर्षा निर्माण होईल तिचे कौतुक कसे करता येईल याचा प्रयत्न करा.‎तिच्यातील अशा गोष्टी शोधा, ज्यांचे आपण मनापासून कौतुक करू‎शकू. ज्या गोष्टींमधून आपल्याला काहीतरी शिकता येईल, त्या मनावर‎बिंबवा. अशा प्रकारे या दोन गोष्टींचा योग्य वापर केला तर त्यासुद्धा‎आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत