Dilip Gavit Gold Matrathi News : भारताच्या वाघांची कमाल, एकाच रेसमध्यो दोघांनी पदके नावावर केलीत. एकाने सुवर्ण तर एकाने रौप्य पदक जिंकले. सुवर्णपदक जिंकणारा नाशिकमधील आदिवासी सुपुत्र असून त्याने इतिहास रचला आहे. आंबच्या झाडावरून पडल्यानंतर उपचारावेळी हात कट करावा लागला, तिथून ते सुवर्णपदकापर्यंतच त्याचा प्रवास सोपा नव्हता. दुसरीकडे रौप्यपदक मिळवणारा बासिल याला जन्म झाल्यापासून हात नव्हता. पण दोघेही वाऱ्याच्या वेगासारखे सुसाट सुटले आणि भारताचा गौरव वाढवला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महाराष्ट्रातील नाशिकच्या सुपुत्राने सुवर्णपदकावर नाव करत इतिहासा रचला आहे. पॅरा अॅथलेटिक्समध्ये भारताने दमदार कामगिरी केली आहे. पुरुषांच्या १०० मीटर टी४७ अंतिम शर्यतीत भारताने गोल्ड (सुवर्ण) आणि सिल्वर (रौप्य) दोन्ही पदके पटकावली. दिलीप महादु गावितने १०.७१ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. यासोबतच त्याने गेम्स रेकॉर्डही मोडला आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली. तर मोहम्मद बासिल मोर्सिंगनाकथने १०.८३ सेकंदांसह शर्यत पूर्ण करत रौप्यपदक मिळवले.
या रेसमध्येच रौप्यपदक जिंकणारा केरळचा मोहम्मद बासिल याचा जन्म झाला तेव्हाच त्याला उजवा हात नव्हता. ज्यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेची निवड चाचणी झाली होती त्यावेळी बासिलने १०.६४ सेकंदात पूर्ण करत आता सुवर्ण जिंकलेल्या गावितला मागे टाकले होते. मात्र फायनल सामन्यामध्ये दिलीपने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले.
भारताच्या गुलवीरसिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्समधील पुरुषांच्या १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी केली. बोचरी थंडी, सतत पडणारा पाऊस यास दाद न देता गुलवीरने हुशारीने स्पर्धा करून मंगळवारी रात्री रूपेरी यश मिळवले. या २५ फेऱ्यांच्या शर्यतीत गुलवीरने सातत्याने आघाडीच्या स्पर्धकांत स्वतःला राखून अखेरच्या मीटरमध्ये घेतलेली मुसंडी निर्णायक ठरली. अखेरच्या चारशे मीटरची बेल झाली आणि ऑस्ट्रेलियाच्या की रॉबिन्सनने सुवर्णपदक जिंकण्यासाठी वेग कमालीचा वाढवला. २८ वर्षीय उत्तर प्रदेशच्या गुलवीरनेही हेच केले आणि त्याने २७ मिनिटे ४९.७८ सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले. रॉबिन्सनची वेळ २७ मिनिटे ४८.९३ सेकंद अशी होती. Commonwealth Games 2026 : दीडशे रुपये रोजंदारी, ते राष्ट्रकुल रौप्य… सायकलवरून रोजचा 40 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या ऋषिकांत सिंगची संघर्षगाथा
हरजिंदर कौरला रौप्य
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चार वर्षांपूर्वीची कामगिरी माफक सुधारण्यात भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौर यशस्वी ठरली. गतस्पर्धेत ब्राँझवर समाधान मानावे लागलेल्या हरजिंदरने वेटलिफ्टिंगमधील महिलांच्या ६९ किलो गटात रौप्यपदक मिळवले. स्पर्धा संपताना खडतर आव्हान आपण पार केल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा