Headlines

देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर सज्ज, मुंबई-बंगळुरू प्रवास वेगवान होणार; किती डबे? मार्ग कोणता?| Maharashtra Times


India’s Second Vande Bharat: मुंबई ते बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन बंगळुरू स्थानकावर दाखल झाली आहे. अंतिम चाचणी झाल्यानंतरलवकरच प्रवाशांसाठी ट्रेन सुरू होणार आहे.

वंदे भारत स्लीपर
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Vande Bharat Sleeper Train : देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन बंगळुरू रेल्वे स्थानकात दाखल झाली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ते केएसआर बंगळुरू रेल्वे स्थानकांदरम्यान धावणारी ही ट्रेन भारतातील सर्वात वेगवान रात्रकालीन रेल्वेगाडी असणार आहे. आता बंगळुरू रेल्वे स्थानकावर या वंदे भारत स्लीपरची अंतिम चाचणी होणार आहे. त्यानंतर मुंबई ते बंगळुरू वंदे भारत स्लीपर प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

अंतिम चाचण्यांसाठी ट्रेन दाखल

चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF)च्या तंत्रज्ञानाचा वापर करून BEMLने ही ट्रेन विकसित केली आहे. ही स्लीपर राखाडी आणि नारंगी रंगाची असून आवश्यक मंजुऱ्या मिळाल्यानंतर ही ट्रेन सुरू होणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील प्रवास वेगवान होणार असून प्रवाशांना एक प्रिमियम आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे. हुबळी-धारवाड, बेळगाव आणि पुणे मार्गे प्रवास करणाऱ्यांना या स्लीपरचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लवकरच ही सेवा उपलब्ध होईल अशी घोषणा मे महिन्यात केली होती. पण अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण करून आवश्यक मंजुऱ्या मिळवूनच ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

Maharashtra TimesMumbai Local: पावसाळ्यातील खोळंबा टाळण्यासाठी मध्य रेल्वेची तयारी; २१० पंप कार्यान्वित, लोकल प्रवासाला दिलासा

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर जानेवारी २०२६ मध्ये हावडा ते कामाख्यादरम्यान सुरू झाली होती. या ट्रेनमुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ तब्बल सहा तासांनी कमी झाला आहे. मुंबई ते बंगळुरू प्रवासाचं अंतरही कमी होणार आहे. सध्या ही ट्रेन दक्षिण रेल्वे किंवा भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आली नसून सर्व चाचण्या पूर्ण झाल्यावरच हस्तांरित केली जाणार आहे. यावेळी सोयीसाठी ही ट्रेन बंगळुरू स्थानकावर ठेवली गेली आहे.

काय आहे वैशिष्ट्ये?

मुंबई ते बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन १६ डब्यांची आहे. या ट्रेनची प्रवासी क्षमता ८२३ असून गाडीमध्ये ६११ बर्थ असणारी ११ एसी ३ टियर (3AC), १८८ बर्थ असलेले ४ एसी २ टियर (2AC) कोट आणि १ फर्स्ट एसी (1AC) कोच असतील. ही ट्रेन ताशी १८० किमी वेगाने धावू शकते. रात्री प्रवास अधिक सुखद करण्यासाठी ट्रेनच्या डब्यांची रचना आरामदायी प्रवासाच्या हेतूने केली आहे. कमीतकमी अडथळे, हालचाल आणि आवाजही कमी होणार असून प्रवाशांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. सुरक्षेसाठी कवच आणि आप्तकालीन परिस्थितींसाठी टॉक-बॅक सेवाही उपलब्ध असेल.

Maharashtra TimesMumbai Metro 4: वडाळा-कासारवडवली मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा, पण कांदळवन बाधित होणार; वनक्षेत्र हस्तांतरणाला मंजुरी

वंदे भारत स्लीपरच्या नव्या एसी कोचची सध्या चर्चा सुरू आहे. रुळांवर चालणाऱ्या एका आलिशान हॉटेल प्रमाणे सेवा दिल्या जाणार आहे. या डब्यात सुधारित स्वच्छतागृहे, प्रवाशांसाठी डिजिटल माहिती, सीसीटीव्ही कॅमेरा आणि पूर्णपणे वातानुकूलित डबे असतील. मुंबई ते बंगळुरू कॉरिडोरवर दररोज हजारो प्रवासी रेल्वेमार्गे प्रवास करतात. व्यावसायिक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी या ट्रेनमुळे सुरक्षित, वेगवान व आरामदायी प्रवासाचा एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा