Headlines

‘गोमूत्र-एक्सपर्ट’ टिप्पणीविरोधात ऑनलाईन मोहीम


आयआयटी मद्रास संचालकांना मोठे समर्थन : 38 देशांच्या वैज्ञानिकांची साथ

वृत्तसंस्था/चेन्नई

आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांना ‘गोमूत्र एक्सपर्ट’ संबोधिणाऱ्या प्रियांका वड्रा यांच्या वक्तव्यावरील वाद वाढला आहे. प्रियांका वड्रांच्या विरोधात एक ऑनलाईन मोहीम सुरु झाली आहे. या मोहिमेला हजारो लोकांचे समर्थन मिळत आहे. या मोहिमेद्वारे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्रियांका वड्रा यांनी ही टिप्पणी मागे घेत माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. 38 हून अधिक देशांमध्ये राहत असलेल्या भारतीय वैज्ञानिकांनी या मोहिमेचे समर्थन केले आहे.

पेपर लीक विरोधी विधेयकावर लोकसभेतील चर्चेदरम्यान प्रियांका वड्रा यांनी व्ही. कामकोटीचा नामोल्लेख न करता सरकारकडून स्थापन समिती माजी आयबी प्रमुख, आयटी कंपनीचा मालक, गोमूत्र एक्सपर्ट असल्याची टिप्णी केली होती. प्रियांका वड्रा यांची टिप्पणी व्यक्तिगत अन् अपमानास्पद आहे. कुठलाही वैज्ञानिक किंवा शिक्षणतज्ञावर टीका त्याचे काम अन् विचारांच्या आधारावर व्हावी, व्यक्तिगत टिप्पणी केली जाऊ नये. अशाप्रकारच्या टिप्पणींमुळे एका प्रतिष्ठित वैज्ञानिकाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचत असल्याने ऑनलाईन मोहीम सुरू करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. ही ऑनलाइन मोहीम कुठलाही राजकीय पक्ष, सरकार किंवा विचारसरणीच्या समर्थनार्थ किंवा विरोधात नाही. याचा उद्देश संसद अन् सार्वजनिक जीवनात सन्मानजक भाषा अन् तथ्यांवर आधारित चर्चेला प्रोत्साहन देणे असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत