वृत्तसंस्था/श्रीनगर
लेह, लडाख परिसरात गुरुवारी सकाळी 6:05 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, लडाखमधील भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किमी खोल होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरून घराबाहेर पडले. तथापि, आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. लेहमध्ये पहाटेच्या वेळी लोक झोपेत असतानाच जमीन हादरल्यामुळे रहिवाशांमध्ये भय निर्माण झाले.
