Headlines

कोयना धरणातून विसर्ग सुरू; कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ ,सांगली प्रशासन अलर्ट मोडवर


Ratnagiri Rain News: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.यासाठी गेल्या काही दिवसांपासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांपर्यंत उचलण्यात आले. परिणामी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सांगली प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

_कोयना धरण
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
रत्नागिरी,अलोरे कोयनानगर: कोयनाधरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कोयना जलाशयातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली येथील कृष्णा नदीवर असलेल्या आयर्विन पुलाजवळ 30 फुटाची पाणी पातळी आहे. चाळीस फूट हे धोकादायक इशारा पातळी असून 45 फूट ही धोकादायक पातळी आहे मात्र नदीकाठच्या असलेल्या एका कॉलनीत नागरीवस्तीत आयर्विन पुलाजवळची पाण्याचीपातळी 35 फुटापर्यंत गेल्यास येथील नागरिकांना स्थलांतर कराव लागतं.

स्थलांतराची टांगती तलवार

त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास नदीकाठच्या नागरिकांवर स्थलांतराची टांगती तलवार कायम आहे. मात्र सुदैवाने सोमवारी सकाळपासून पावसाने काहीशी उघडीप दिल्याने तूर्तासतरी स्थलांतराचा धोका नाही. पण कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व कृष्णा नदीला पाणी येऊन मिळणाऱ्या अन्य पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर असून या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Maharashtra TimesNashik News: राष्ट्र प्रथम ट्रेंडिंगमध्ये!;’जेन झी’मध्ये मतमतांतरे, नाशिकमध्ये फलकबाजी चर्चेत

पाणीपातळी सुमारे ३० फूट होती

रविवारी पावसाची उघडीप झाली असली, तरी कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या नैसर्गिक प्रवाहामुळे आयर्विन पुलाजवळ नदीची पाणीपातळी सुमारे ३० फूट होती. त्याठिकाणी ५७,६९८ क्युसेक इतका विसर्ग नोंदविण्यात आला आहे. या वेगाने अवघ्या २४ तासांत सुमारे ४.९९ टीएमसी, म्हणजेच जवळपास ५ टीएमसी पाणी सांगलीतून वाहून नेण्यात आले.

सहा वक्री दरवाजे पाच फुटापर्यंत उचलण्यात आले

कोयना धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोयना धरणाचे सहा वक्रूी दरवाजे पाच फुटापर्यंत उचलण्यात आले होते मात्र हे दरवाजा आता पाच फुटावरून चार फुटापर्यंत खाली आणण्यात आले आहेत.कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी०३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ५ फुटावरून ४ फुटापर्यंत खाली आणून २३,८५८ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला.

Maharashtra TimesNashik Rain: सिंहस्थ कामांची पोलखोल! गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर पितळ उघड; राज्यपाल आज घेणार आढावा

प्रशासनाचे लक्ष

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू आहे. त्याद्वारे१०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण २४,९०८ क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या पाण्याच्या प्रवाहानूसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो या सगळ्या परिस्थितीवर कोयनानगर सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशासन लक्ष ठेवून आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व आवश्यक ती खबरदारी घ्यावी अस आवाहन कोयनानगर सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा