![]()
Pune Crime : ऑनलाईन औषध मागवून घरभर धूर केला, पिंपरीत उच्चशिक्षित कुटुंबाचा वेदनादायी अंत, पित्यामागून मायलेकही मृत्युमुखी
आर्थिक विवंचनेतून विषारी औषधाचा धूर करून एकाच कुटुंबातील तीन जणांनी जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यातील विनोद पिल्लई (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (एक ऑगस्ट) घडली, तर विनोद यांची पत्नी सिरजा पिल्लई (वय ४५) आणि मुलगी पौर्णिमा पिल्लई (वय १९, सर्व रा. करिष्मा ग्लोरी सोसायटी, मोरवाडी, पिंपरी) या दोघींचा वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला.
