आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. तुमच्या आधार कार्डवरील मोबाईल नंबर, राहण्याचा पत्ता किंवा फोटो जुना झाला असेल, तर तो बदलणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा लोकांना वाटते की ही प्रक्रिया कठीण आहे, पण ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरबसल्या हा बदल अगदी सहज आणि सोप्या स्टेप्समध्ये करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांच्या सुविधेसाठी विविध अपडेट्स जारी केले आहेत. जर तुमच्या आधार कार्डवरील पत्ता, मोबाईल नंबर किंवा फोटो जुना झाला असेल, तर तो बदलण्यासाठी खालील नियमांचे आणि अधिकृत प्रक्रियेचे पालन करावे.
1. आधार कार्डवरील पत्ता बदलण्याची सोपी ऑनलाईन पद्धत
- आधार कार्डमधील पत्ता बदलण्यासाठी तुमच्याकडे नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
- प्रथम UIDAI च्या अधिकृत myAadhaar पोर्टलला भेट द्या.
- तुमचा 12 अंकी आधार नंबर आणि मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगइन करा.
- ‘Update Aadhaar Online’ किंवा ‘Address Update’ हा पर्याय निवडा.
- तुमचा नवीन पत्ता अचूक भरा आणि त्यासाठी वैध कागदपत्र (उदा. रेशन कार्ड, वीज बिल, पासपोर्ट) स्कॅन करून अपलोड करा.
- जर स्वतःचे कागदपत्र नसेल, तर ‘Head of Family’ (HOF) च्या संमतीने देखील पत्ता बदलता येतो.
- शुल्क आणि कालावधी: यासाठी 50 ऑनलाईन फी भरावी लागते. ही प्रक्रिया साधारणपणे 7 ते 30 दिवसांत पूर्ण होते.
2. मोबाईल नंबर अपडेट कसा करावा?
- सुरक्षेच्या कारणास्तव, आधार कार्डमध्ये नवीन मोबाईल नंबर लिंक करणे किंवा जुना नंबर बदलणे पूर्णपणे ऑनलाईन पोर्टलवरून करता येत नाही. त्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत.
- नवीन अधिकृत आधार ॲप पद्धत: UIDAI च्या नवीन अधिकृत आधार ॲपच्यामदतीने ‘Mobile Number Update’ ची विनंती नोंदवता येते. यामध्ये नवीन नंबर टाकून Face Authentication (चेहरा पडताळणी) करावी लागते.
- आधार सेवा केंद्र किंवा पोस्टमन: तुम्ही जवळच्या Aadhaar Enrolment Centre ला भेट देऊन किंवा इंडिया पोस्टच्या पोस्टमनमार्फत बायोमेट्रिक पडताळणी करून मोबाईल नंबर लिंक करू शकता. यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नसते, फक्त 50 ते 75 शुल्क लागू होते. (REF.)
3. आधार कार्डवरील फोटो कसा बदलावा?
- आधार कार्डवरील फोटो हा बायोमेट्रिक डेटाचा भाग असल्यामुळे तो ऑनलाईन बदलता येत नाही. त्यासाठी पुढील अधिकृत पद्धत वापरावी
- UIDAI च्या संकेतस्थळावरून ‘Aadhaar Update Form’ डाऊनलोड करा किंवा केंद्रावर मिळवा.
- फॉर्म भरून जवळच्या अधिकृत ‘Aadhaar Seva Kendra’ मध्ये जमा करा.
- तेथील अधिकारी तुमच्या वेबकॅमद्वारे नवीन लाइव्ह फोटो घेतील आणि फिंगरप्रिंट्स मॅच करतील..
- फोटो बदलण्यासाठी (बायोमेट्रिक अपडेट) 100 ते 125 अधिकृत शुल्क आकारले जाते. या कामासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राची आवश्यकता नसते.
महत्त्वाची नोंद व थेट लिंक्स
नागरिकांनी फसवणुकीपासून वाचण्यासाठी केवळ अधिकृत UIDAI पोर्टल (myaadhaar.uidai.gov.in) किंवा जवळच्या शासकीय केंद्राचाच वापर करावा. तसेच, आधारमधील जुनी कागदपत्रे मोफत अपडेट करण्याची सुविधा myAadhaar पोर्टलवर 14 जून 2027 पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्याचा नागरिक मोफत लाभ घेऊ शकतात.

