दरमहा पगारातून PF कापला जाऊनही मोबाईलवर मेसेज न येणे ही अनेक नोकरदारांची मोठी समस्या आहे. याचे मुख्य कारण म्हणजे PF खात्याशी चालू मोबाईल नंबर लिंक नसणे होय. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ने EPFO अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अवघ्या 5 मिनिटांत मोबाईल नंबर लिंक किंवा अपडेट करण्याची अत्यंत सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

तुम्ही नोकरी करत असाल आणि दरमहा तुमच्या पगारातून PF (Provident Fund) कापला जात असेल, परंतु तुम्हाला त्याचा मोबाईलवर मेसेज (SMS) येत नसेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. EPFO कडून PF जमा झाल्याचा मेसेज न येण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या PF खात्याशी (UAN) तुमचा चालू मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा तो जुना असणे.
कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी EPFO ने ऑनलाईन पोर्टलवर मोबाईल नंबर अपडेट किंवाचेंज करण्याची अत्यंत सोपी प्रक्रिया दिली आहे. तुम्ही घरबसल्या केवळ 5 मिनिटांत हा नंबर कसा लिंक करू शकता, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
मोबाईल नंबर लिंक/बदलण्याची सोपी ऑनलाईन पद्धत
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या: सर्वात आधी EPFO च्या अधिकृत Unified Member Portal वर जा.
- लॉगिन करा: तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा (Captcha) कोड टाकून ‘Sign In’ करा.
- ‘Manage’ पर्याय निवडा: लॉगिन झाल्यानंतर वरच्या बाजूला दिलेल्या मेनू बारमधील ‘Manage’ या पर्यायावर क्लिक करा.
- ‘Contact Details’ वर जा: ड्रॉपडाउन मेनूधून ‘Contact Details’हा पर्याय निवडा.
- नंबर बदला: येथे तुमचा जुना मोबाईल नंबर दिसेल. त्यासमोरील ‘Check Mobile Number’ च्या बॉक्सवर टिक करा.
- नवा नंबर टाका: आता तुम्हाला जो नवीन मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, तो दोनदा (New Mobile Number आणि Re-enter Mobile Number) टाईप करा.
- ओटीपी पडताळणी: यानंतर ‘Get Authorization Pin’ वर क्लिक करा. तुमच्या नवीन मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल.
- सबमिट करा: तो ओटीपी टाकून ‘Save Changes’ वर क्लिक करा. तुमचा नवीन मोबाईल नंबर पीएफ खात्याशी त्वरित लिंक होईल.
‘या’ गोष्टींची काळजी घ्या
आधार कार्डशी लिंक असावा: तुम्ही जो मोबाईल नंबर पीएफ खात्याशी लिंक करत आहात, तोच नंबर तुमच्या आधार कार्डशी (Aadhaar Card) देखील लिंक असणे अनिवार्य आहे. दोन्ही नंबर वेगळे असल्यास ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
नाव आणि जन्मतारीख: तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि जन्मतारीख ही पीएफ खात्यावरील माहितीशी जुळणारी असावी.

