Priyanka Chaturvedi on Ramayana Trailer:गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या ‘रामायणम्’ सिनेमाची चर्चा होती. प्रेक्षकांनाही या सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आला असून या ट्रेलरवरून आता दोन गट पडल्याचं चित्र आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई:नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘ रामायणम् ‘ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, यावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे चित्रपटाच्या भव्यतेचं कौतुक होत असतानाच, दुसरीकडं ज्यांना हा ट्रेलर आवडला नाहीये, त्यांनी स्पष्टपणे मतं मांडली आहे. अनेक सेलिब्रिटींनी या ट्रेलरचं उघड कौतुक केलं असलं तरी अनेकांनी खटकलेल्या गोष्टीही सांगितल्या आहेत. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या ट्रेलरमध्ये खटकलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत.
प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘रामायणम्’ च्या या ट्रेलरवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत या चित्रपटाच्या निर्मात्यांवर आणि कलाकारांच्या निवडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
Ramayana Trailer Review: काय आवडलं,काय खटकलं?सगळं छान, पण एका गोष्टीवर प्रेक्षकांची नाराजी, महत्त्वाचं पात्रच ‘रामायणम्’च्या ट्रेलरमधून गायब “हाइप पूर्णपणे फ्लॉप ठरली” ट्रेलरबाबत आपली प्रतिक्रिया देताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, आता मला समजलं की त्यांनी ‘रामायणम्’चा प्रोमो इतका वेळ लपवून का ठेवला होता. या चित्रपटाबाबत जो प्रचंड उत्साह आणि हाइप तयार केला गेली होती, हा ट्रेलर त्याच्या पात्र अजिबात नाहीए. चुकीचे कास्टिंग, अभिनयापेक्षा केवळ VFX वर दिलेला भर, विचित्र पोशाख आणि अधिक चांगले होऊ शकलं असतं असं संगीत.हे स्पष्ट आहे की रामानंद सागर यांचं दूरदर्शनवरील ‘रामायण’च येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या लक्षात राहील.
प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या पोस्टमधून चित्रपटाच्या मुख्य घटकांवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी कलाकारांची निवड चुकीची असल्याचं म्हटलंय . त्यांनी प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर आणि माता सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी यांच्या निवडीवर त्यांनी अप्रत्यक्षपणे आक्षेप घेतला.
तसंच VFX चा अतिवापर असल्याचंही त्यांनी म्हटलं. चित्रपटात भावनिक पकडीपेक्षा आणि अभिनयापेक्षा तंत्रज्ञानाचा (VFX) अतिवापर झाला असल्याचं त्यांनी म्हटल आहे.
रामानंद सागर यांच्या रामायणशी तुलना १९८७ मधील रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील साधेपणा आणि प्रामाणिकपणा आजच्या चित्रपटांमधील मार्केटिंगच्या स्टंटमध्ये दिसत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.
नेटकऱ्यांमध्ये दोन गट नितेश तिवारी यांच्या ‘रामायणम्’ चित्रपटाचा पहिला भाग ५ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात धडकणार आहे. चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांचे दोन गट पडले आहेत. काही लोक भव्य व्हिज्युअल्स आणि ए. आर. रहमान यांच्या संगीताचं कौतुक करत आहेत, तर प्रियंका चतुर्वेदी यांच्याप्रमाणेच काही प्रेक्षक पात्रांच्या लूक आणि संवादांवर असमाधान व्यक्त करत आहेत.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा