Headlines

सेंथिलकुमार विजेता


“““““““““““““““““““

शनिवारी येथे झालेल्या बुडापेस्ट खुल्या पीएसए कॉपर स्तरावरील स्क्वॅश स्पर्धेत भारताचा स्क्वॅशपटू व्हेलावन सेंथिलकुमारने विजेतेपद पटकाविताना हंगेरीच्या बालाझेस फरकासचा पराभव केला.

आठव्या मानांकित सेंथिलकुमारने फरकासचा 11-4, 11-2, 11-3 अशा गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. 2024 साली सेंथिलकुमारने फरकासचा पराभव केला होता. या स्पर्धेमध्ये उपांत्यफेरीत सेंथिलकुमारने आपल्या देशाच्या वीर चोत्रानीचा पराभव केला होता. तसेच त्याने मलेशियाच्या 19 व्या मानांकित योव यालाही पराभूत केले होते. आंतरराष्ट्रीय स्क्वॅश पीएसए स्तरावरील स्पर्धेतील सेंथिलकुमारचे हे पहिले विजेतेपद आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत