Headlines

सगुण-निर्गुण: अखंड भाव-भक्ती हवी… – anirudh shandilya sagun nirgun article on mukundraj granth vivekasindhu


-अनिरुद्ध शांडिल्य

मुकुंदराजाचा सर्वपरिचित ग्रंथ म्हणजे ‘विवेकसिंधु’. त्याच्या पहिल्या प्रकरणात मुकुंदराज शंकराला नमन करून दुसऱ्याच ओवीत म्हणतात, ‘तूं निर्गुण निराकारु। निःसंगुनिर्विकारु।। तुझेया स्वरूपाचा पारु। नेणती ब्रह्मादिक।। म्हणजे तू गुणरहित, आकार नसलेला आणि विकाररहित आहेस. अशा या तुझ्या स्वरूपाचा पार म्हणजे अन्त, ब्रह्मादिकांनाही जाणता येत नाही’. मग त्याला जाणायचं कसं? मुकुंदराजसांगतात, ‘आत्मज्ञानामुळंच तुला जाणून घेता येतं’.

जाणत्यांनी, अभ्यासकांनी, साधकांनी सांगितल्याप्रमाणं आत्मज्ञान मिळवण्याची पहिली पायरी, त्याच्या सगुण रूपाचं अखंड स्मरण ठेवण्याची. हरिपाठामध्ये ज्ञानोबा माउली म्हणते, ‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।। पुण्याची गणना कोण करी।।’ तोंडानं हरीचंच नाव घेत राहा. असं त्याचं सतत स्मरण करत राहिल्यानं पुण्याची इतकी पुंजी जमा होत राहील की ती मोजता यायची नाही. सुखाच्या मखमली दिवसांतही त्याची आठवण कायम ठेवा.

आपली अठरा पुराणंही हरीचंच गुणसंकीर्तन करतात, हे ध्यानात ठेवा… दुःखी, वेदनादायी, अपयशी दिवसांत हरी आठवतोच ना! पण अशा कठीण दिवसांतच नाही, तर प्रत्येक क्षणी हरीचं नाव घ्यायचं. प्रत्येक श्वास घेताना श्रीहरी, उच्छवास टाकतानाही श्रीहरी. खाताना, जेवताना, आंघोळ करताना, पाणी पिताना, अभ्यासाला सुरुवात करताना… श्रीहरीचं नाव घ्यायचं.

श्वासोच्छवास करणं जितकं सहजपणं होतं, तितकंच श्रीहरीचा आठव करणं व्हायला हवं. हे सारं फार कठीण आहे. मग काय करायचं? श्रीहरीची मूर्ती सतत नजरेसमोर ठेवायची. मनात अहोरात्र तेवती ठेवायची. मग हळूहळू ‘त्या’ची आठवण हा आपला सहजभाव होतो. तसा तो व्हायला किती दिवस लागतील? तर त्याचं काही गणित नाही. खुश्कीचा मार्ग नाही. मधला मार्ग आहे, असं सांगणारे असतातच. ते मोठाले शब्द वापरतात. भक्तांचे ताफे बाळगतात. अशांबद्दल एकनाथ महाराज सांगतात, ‘पोटी नाही परमार्थ। धरोनिया अर्थस्वार्थ। स्वये म्हणविती हरिभक्त। यानांवनिश्चित भजनदंभू।। धनजोडावयाकारणें। टिळेमाळामुद्रा धरणें। धनेच्छा उपदेश देणें। या नाव जाणणें दीक्षाभू।।…’

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत