Headlines

श्रेयसला अपयशाचा फटका, अन् त्याचवेळी सूर्याच्या पत्नीने शेअर केलेल्या फोटोची चर्चा; कारण काय?


Suryakumar Yadav Viral Photo : देविशा शेट्टीने शेअर केलेल्या सूर्यकुमार यादवच्या एका साध्या कौटुंबिक फोटोने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. टी-शर्टवरील दोन शब्दांमुळे सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चेमागे नेमकं काय कारण आहे, चाहते कोणते अंदाज व्यक्त करत आहेत आणि यावर सूर्यकुमार किंवा देविशाने काय प्रतिक्रिया दिली आहे?

Suryakumar Yadav Viral Photo
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा माजी टी२० कॅप्टन आणि धडाकेबाज बॅट्समन सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलाय. पण, यावेळी निमित्त कोणती मॅच नसून त्याच्या पत्नीने म्हणजेच देविशा शेट्टीने इंस्टाग्रामवर शेअर केलेला एक फोटो आहे. या एका फोटोमुळे क्रिकेट फॅन्समध्ये नवीनच चर्चा सुरू झालीये. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सूर्या आपल्या लहान मुलासोबत निवांत वेळ घालवताना दिसतोय. या साध्या कौटुंबिक क्षणात सूर्याने एक काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसतो, ज्यावर इंग्रजीत दोन शब्द लिहिले आहेत जे ‘कॅप्टन’ आणि ‘लीडर’ असे आहेत.

‘कॅप्टन’ शब्दावर मारली फुली

लोकांची नजर जेव्हा सूर्याच्या टी-शर्टवरील डिझाईनवर पडली, तेव्हापासून सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यात. कारण, टी-शर्टवर लिहिलेल्या ‘कॅप्टन’ या शब्दाला एका रेषेने खोडण्यात आलेलं आहे, तर त्याच्या ठीक खाली असलेला ‘लीडर’ हा शब्द एकदम साफ दिसत होता. पाहता पाहता हा फोटो खूप व्हायरल झाला. श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत भारतीय टीमने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर अतिशय वाईट कामगिरी केल्यानंतर हा फोटो समोर आल्यामुळे, “हा थेट भारतीय सिलेक्टर्सवर मारलेला टोला आहे का?” असा सवाल फॅन्स विचारत आहेत. अर्थात, यावर अजून सूर्या किंवा देविशाने काहीही भाष्य केलेलं नाही.

Maharashtra TimesIND vs ENG 5th T20 : भारताने जिंकला टॉस, प्लेइंग 11 मध्ये 2 मोठे बदल; संजूची एन्ट्री अन् बेबी बॉसही बाहेर, जाणून घ्या

Suryakumar yadav wife photo

ऐन मोक्यावर फोटो आल्याने चर्चा

हा फोटो ज्या टायमिंगला शेअर केला, त्यामुळे संशय जास्तच वाढलाय. काही दिवसांपूर्वीपर्यंत भारताच्या टी२० टीमची कॅप्टन्सी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला अचानक संपूर्ण टी२० टीममधूनच बाहेर केले आहे. अशा मॅच-विन्निग खेळाडूला सिलेक्टर्सनी अचानक डावलल्यामुळे फॅन्स आधीच संतापले होते. त्यामुळेच इंटरनेटवर अनेक जण या कट केलेल्या ‘कॅप्टन’ शब्दाचा संबंध त्याच्याकडून कॅप्टन्सी हिरावून घेण्याशी जोडत आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, हातात कॅप्टन्सी नसली तरी मैदानावरील लीडरशिप सर्वात महत्त्वाची असते, हेच सूर्याला यातून दाखवायचे आहे.

Maharashtra TimesVirat Kohli : सकाळी 6 वाजताच मैदानावर पोहोचायचा किंग कोहली; 11 वर्षांनंतर कोचने उघड केलं कारण, इंग्लंड दौऱ्याशी आहे कनेक्शन

सूर्या किंवा देविशाकडून कोणतंही उत्तर नाही

सोशल मीडियावरील या सगळ्या चर्चांवर सूर्यकुमार यादव किंवा देविशा शेट्टीने अजूनतरी काहीही उत्तर दिलेले नाही. दोघांपैकी कोणीही काहीच न बोलल्यामुळे, टी-शर्टच्या डिझाईनमागे खरोखरच काही खास कारण होते की तो केवळ एक योगायोग होता, हे सांगणे कठीण आहे. सध्या या धडाकेबाज बॅट्समनचा आंतरराष्ट्रीय करिअरमधील काळ थोडा कठीण सुरू आहे. एक काळ असा होता जेव्हा जगातील सर्वात खतरनाक टी२० बॅट्समन म्हणून सूर्याचे नाव घेतले जायचे आणि कॅप्टन म्हणूनही त्याचा रेकॉर्ड भारी होता.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा