IND vs ENG T20 Match : भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदावरून काढल्यानंतर एकही सामना भारताने टी-२० मध्ये जिंकला नाही. आज भारताचा इंग्लंडसोबत अखेरचा सामना असणार असून या सामन्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना सूर्यकुमार यादवला का काढले याबाबत मॅनेजमेंटने स्पष्टीकरण दिलेय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पाचवा आणि अखेरचा टी-२० समना आज पार पडणार आहे. या सामन्याचे प्रक्षेपण संध्याकाळी ७ पासून हॉटस्टार, सोनी स्पोर्ट्सवर असणार आहे. हॅम्पशायर बोल, साऊदम्पटन येथे हा सामना पार पडणार आहे. इथली खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला वेग आणि उसळी देते, तर फलंदाजांना स्थिरावल्यावर मोठे फटके खेळण्याची संधी देते. जसजशी खेळपट्टी कोरडी होते आणि चेंडू जुना होतो, तसतशी फिरकी गोलंदाजांना अनेकदा मदत मिळते. शेवटच्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीकडून सर्वांना मोठ्याे खेळीची अपेक्षा आहे. संपूर्ण मालिकेत वैभव चांगली सुरूवात करूनही अपयशी ठरला आहे. सूर्यकुमार यादवला का काढले याबाबत टीम मॅनेजमेंटमधील कोचने पहिल्यांदाच जाहीरपणे यावर स्पष्टीकरण दिले आहे.
भारतीय टी-२० क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धुरा हाती घेतल्यानंतर श्रेयस अय्यरवर सलग दोन टी-२० मालिका गमावण्याची नामुष्की आली. गुरुवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात ९ विकेट सपाटून मारा खावा लागल्याने भारतीय संघाच्या हातून मालिकाही निसटली. अशावेळी संघव्यवस्थापनाकडून प्रथमच माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याला हटवण्याबाबतची भूमिका स्पष्ट झाली आहे. IND W vs ENG W Test : ऐतिहासिक कसोटीत भारत पहिल्या दिवशी 285 वर ऑल आऊट; स्मृती, हरमनप्रीत आणि दीप्तीची अर्धशतके गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी याबाबत संघाच्या वतीने भाष्य केले. ‘भारतीय क्रिकेट संघाचे संयोजन करताना तुम्हाला भविष्याचा वेध घेत पावले टाकावी लागतात. सूर्यकुमार यादव संघनायक म्हणून उत्तमच होता; पण त्याच्या वाढत्या वयाचा मुद्दा लक्षात घेऊन त्याला कर्णधारपदावरून हटवावे लागले, असे डोशेट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. Rohit Shrama : अरे वा, म्हणजे आपल्याकडचाच! इंग्लंडमध्ये रोहित शर्माचा कोकणच्या सुपूत्राकडून सराव, पठ्ठ्याची शेवटी एक मागणी ‘आम्हाला पुढील दोन वर्षांच्या दृष्टिने नियोजन करायचे होते. पुढील वर्ल्ड कप टी-२० साठी आतापासूनच संघबांधणी करताना कठोर निर्णय घ्यावे लागले’, याकडेही डोशेट लक्ष वेधतात. ‘भविष्याच्या दृष्टिने संघात केलेल्या बदलांशी जुळवून घेण्यास आणि संघाची भट्टी जमून येण्यास वेळ लागेल. या संघात जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांच्यासारखे मुरलेले खेळाडू नाहीत हेदेखील विसरू नका’, असे डोशेट म्हणाले.
भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सहा सामन्यांनंतरही श्रेयस अय्यरला सामना जिंकता आलेला नाही. या यादीत लाला अमरनाथ (१०), विनू मंकड (६), नरी काँट्रॅक्टर (८) आणि मन्सूर अली खान पतौडी (९) यांचाही समावेश.
गेल्या सलग सहा टी-२० सामन्यांत भारतीय संघ विजयाविना. क्रिकेटच्या या प्रकारात प्रथमच भारतावर
अशी नामुष्की
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० पराभवामुळे भारतीय संघाने प्रथमच ब्रिस्टल स्टेडियमवरील लढत गमावली. याआधीचे येथील चारही सामने (३ वनडे, १ टी-२०) भारताने जिंकले होते.
२०१९ न्यूझीलंड (परदेश) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (मायदेश) २०१९मध्ये सलग टी-२० मालिका गमावल्यानंतर भारताचा प्रथमच सलग दोन मालिकांत पराभव
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा