शिवराज मोटेगावकरकडून बेकायदेशीररित्या आठ प्लॉट खरेदी, आरटीआय अंतर्गत धक्कादायक माहिती समोर – shivraj motegaovkar has illegally purchased eight plots; shocking information has come to light under rti
शिवराज मोटेगावकरकडून बेकायदेशीररित्या आठ प्लॉट खरेदी, आरटीआय अंतर्गत धक्कादायक माहिती समोर – shivraj motegaovkar has illegally purchased eight plots; shocking information has come to light under rti
नीट पेपर फुटीप्रकरणामुळे पुन्हा एकदा लातूरचा ट्युशन एरिया चर्चेत आला आहे. लातूर शहरातील मध्यवर्ती भागास काही काळापूर्वी उद्योग भवन या नावाने ओळखले जायचे.२०१० नंतर या एरियाची ओळख ट्युशन एरिया म्हणून होऊ लागली. या भागाचा वाद हा केवळ कोचिंग क्लासेसपुरता मर्यादित नाहीये.तब्बल २७ एकर औद्योगिक जमिनीच्या मूळ उद्देशाशी हा वाद जोडलेला आहे. कारण या जमिनीची किंमत साधारण तीन हजार कोटी रुपये आहे.शिवराज मोटेगावकरने या ठिकाणी रशीद तिकीट लावलेल्या कागदावर आठ प्लॉट खरेदी केले.बेकायदेशीर भूखंडाला मात्र मनपाचे संरक्षण देत असल्याचं चित्र आहे.