Headlines

शिळफाट्याजवळ बुलेट ट्रेनसाठी बोगदा, खाडीखालून 7 किमी लांब रेल्वे मार्ग; 2 तासांत प्रवास| Maharashtra Times


Thane Creek Tunnel: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सध्या वेगाने सुरू असून ऑगस्ट 2027पर्यंत पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच समुद्राखालून बोगदा तयार केला जात आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी देशात पहिल्यांदाच पाण्याखाली रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. यासाठी सध्या वेगाने काम सुरू आहे. ठाण्याच्या खाडीखालून 7 किलोमीटर लांब रेल्वे मार्ग तयार केला जात आहे. यामुळे मुंबई हाय-स्पीड रेल्वे ट्रेनचं जाळं विस्तारणार आहे. ठाणे जिल्ह्यात शिळफाट्याजवळ या बोगद्याचं काम सुरू असताना दिसून येत आहे. डोंगर आणि खाडीखालून जाणाऱ्या या मार्गामुळे प्रवास वेगवान होईल.

2 तासांत अंतर पार होणार

वांद्रे-कुर्ला संकुल येथील भुयारी बुलेट ट्रेन स्थानकापासून सुरू झालेल्या हा बोगदा मुंबई महानगर प्रदेशातील काही प्रमुख स्थळांना जोडणार आहे. महाराष्ट्रात ठाणे, विरार, बोइसर आणि गुजरातमध्ये वापी, बिलिमोरा, सुरत, भारुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी स्थानकं असतील. मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे. केवळ 2 तास आणि 7 मिनिटांमध्ये मुंबई ते अहमदाबाद अंतर पार होणार आहे.

Maharashtra TimesMumbai-Bengaluru Vande Bharat: पहिली मुंबई-बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर’ प्रवासासाठी सज्ज, 14 तासांत अंतर होणार पार; नवा व्हिडीओ चर्चेत

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 1.08 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी लागणारी 100 टक्के संपादित झाली असल्याची माहिती NHSRCLने दिली आहे. या प्रकल्पासाठी 1.390 कोटी जमीनीचा वापर होणार आहे. यापैकी 430 हेक्टर जमीन महाराष्ट्रात असून उरलेली 960 हेक्टर जमीन गुजरात आणि दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात पसरलेली आहे.

25 नदीपुलांवर उन्नत मार्ग

मुंबईत बुलेट ट्रेनचे बहुतेक रेल्वे मार्ग बोगद्यातून जाणार आहेत. यासाठी टनेल बोरिंग मशीन (TBM) आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) चा वापर करण्यात येत आहे. एका 13.1 व्यासाच्या ट्यूबमधून दोन्ही मशीन घेऊन जाऊन हे खोदकाम सुरू आहे. याशिवाय इतर 90 टक्के मार्ग उन्नत आहे. या उन्नत मार्गासाछी 28 स्टील पूल बांधण्यात आले आहेत. यापैकी 25 पूल नद्यांवर उभारले आहेत. 21 पूल गुजरातमध्ये तर 4 पूल महाराष्ट्रात आहेत.

Maharashtra TimesKarjat Roha Railway Line : कर्जत-रोहा रेल्वेमार्गाची नवी जोडणी; मालवाहतुकीच्या प्रवासवेळेत बचत होणार, प्रकल्पाची वैशिष्ट्ये अन् फायदे काय?

याशिवाय मार्गावर 8 डोंगराळ बोगदेसुद्धा आहेत. यापैकी सात पूल महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आहेत आणि एक पूल गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात स्थित आहे. प्रत्येक 12 स्थानकांची बांधणी ते स्थानक असलेल्या शहरावर आधारित असणार आहे. याशिवाय प्रत्येक स्थानकाबाहेर ट्रान्सपोर्ट हब तयार केले असतील. यामुळे रिक्षा, कॅबचालकांसाठी स्टँड उपलब्ध असतील तसचं पार्किंगची व्यवस्था असेल. त्याबरोबर मेट्रो, बस आणि रेल्वे स्थानकांशी जोडणीसुद्धा उपलब्ध असेल.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा