Headlines

शरद पवार गटाला मोठा धक्का, जिल्हाध्यक्षांसहित माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. अजित पवार गटात शरद पवार गटांचे जिल्हाध्यक्षांनी प्रवेश केला. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

Hingoli News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गजानन पवार, हिंगोली : हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक दिलीप चव्हाण यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सोबत अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींनीही पक्षप्रवेश केला आहे.

जिल्हाध्यक्षांसहित माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांचाही पक्षप्रवेश
बुधवार सायंकाळी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात दिलीप चव्हाण यांनी अधिकृतपणे अजित पवार गटात प्रवेश केला. या वेळी त्यांच्या सोबत खालील प्रमुख मान्यवरांनीही पक्षप्रवेश केला आहेत. माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे पेहलवान, माजी उपनगराध्यक्ष बिरजू यादव, आरेफ बागवान, अ‍ॅड. स्वप्निल गुंडेवार, शेख निहाल, अ‍ॅड. अमित कळासरे, शेख शकील, माजी नगरसेवक बाबाभाई, महेंद्र धबाले, संतोष गुट्टे आणि कळमनुरी येथील माजी नगरसेवक. या पक्षप्रवेश सोहळ्यास मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राजूभैय्या नवघरे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे हे मान्यवर उपस्थित होते.

ऑपरेशन लोटस, टायगरची चर्चा असताना अजित पवार गटही सक्रीय
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पक्षबांधणी केली जात आहे. अनेक पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेत्यांना पक्षाशी जोडले जात आहे. एकीकडे भाजपकडून ऑपरेशन लोटस आणि शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही विरोधी पक्षातील स्थानिक नेतृत्त्वाला पक्षात सहभागी करुन घेत आहे. महायुतीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा प्रयत्न तीनही पक्षांकडून केला जात आहे. तरीही जिल्ह्यांमधील राजकीय स्थान बळकट करण्यासाठी तीनही पक्ष स्थानिक पातळीवरील आपली ताकद वाढवत आहेत.

हिंगोलीतील हा पक्षप्रवेश मात्र शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हिंगोलीतील राजकीय परिस्थितीत या प्रवेशामुळे बदल होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला ओ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच आता जिल्ह्यात पक्षबांधणी करावी लागणार आहे.

नारायण परब

लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. जानेवारी २०२५ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. राजकारण, व्यापार, देश-विदेश, क्रीडा, करिअर यांसारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे.

बीएमएमचं शिक्षण घेत असताना त्यांनी झी २४ तास या मराठीतील अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये न्यूज डेस्कवर काम केले . त्यादरम्यानच त्यांनी जनसंपर्क क्षेत्रातही काम केले. त्यावेळी राजकीय पक्षाच्या प्रचार मोहिमेचे नियोजनात त्यांचा सहभाग होता. व्यावसायिक कॉन्फरन्सचे आयोजनामध्येही सक्रीय सहभाग घेतला. २०१७ मध्ये महाविद्यालयातील सहकाऱ्यांसोबत वेब महाराष्ट्र हे डिजिटल पोर्टल त्यांनी सुरू केले. ज्यात क्रीडा, राजकारण, देश-विदेश, सिनेमा यासाठी बातम्यांचे लेखन केले. पोर्टलचे सोशल मीडिया हँडलही त्यांनी सांभाळले. पुढे विविध इंस्टाग्राम पेजसाठीही कंटेन्टची निर्मिती केली.

२०२४ मध्ये त्यांनी नवराष्ट्र वृत्तपत्राच्या वेबसाईटसाठी न्यूज रायटर म्हणून काम केले. तेथे करिअर, महाराष्ट्र, व्यापार या कार्यक्षेत्रातील बातम्या करण्यासोबत विविध राज्यातील विधानसभा निवडणूक , प्रचारसभा, निकाल यांचे विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी विशेषत: आंतरराष्ट्रीय, व्यापार या कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना त्यांनी प्राधान्य दिलं. बिजनेस सक्सेस स्टोरी, मुंबई लोकल स्टेशनच्या नावाचा इतिहास, प्रजासत्ताक दिन आदी विषयांवर लेख मालिका लिहिली. यासोबत देश, स्थानिक स्तरावरील राजकारण क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बिहार, दिल्ली, मुंबई महापालिका, नगरपालिका निवडणूक, निकाल यांचे विश्लेषण केले.

शिक्षण क्षेत्र
२०१७ मध्ये त्यांनी व्याख्याता म्हणून साठ्ये महाविद्यालयाच्या जनसंवाद आणि माध्यम विभागात शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पालघर येथील वाडा महाविद्यालय, मिरारोड येथील एल आर तिवारी महाविद्यालय, विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात माध्यम विभागात सहायक प्राध्यापक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय रिसर्च कॉन्फरन्समध्ये रिसर्च पेपरही सादर केला. सध्या ते साठ्ये महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात ९ वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे.

शैक्षणिक पात्रता
नारायण परब यांनी २०१४ मध्ये साठ्ये महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. २०१७ मध्ये त्यांनी मुबई विद्यापीठातून जनसंवाद आणि पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन काळात सामान्य-ज्ञान स्पर्धेत त्यांनी अनेक पारितोषिके जिंकली. वाचन, खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये त्यांना रुची आहे.आणखी वाचा