Headlines

वैभवला फ्लॉप म्हणू नका! झिम्बाबेचा कॅप्टन सिकंदर महत्त्वाचं बोलला; झिम्बाबे दौऱ्याआधी सूर्यवंशीबद्दल काय म्हणाला?


Sikandar Raza on Vaibhav Suryavanshi : वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला इंग्लंडमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र, झिम्बाबे दौऱ्याआधी सिकंदर रझाने त्याच्यावर विश्वास व्यक्त करत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.

Sikandar Raza on Vaibhav Suryavanshi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेत मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्याला २३ जुलैपासून सुरुवात होणार असून, पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. या सामन्याआधीच झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने भारतीय संघातील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची पाठराखण केली आहे. इंग्लंड दौऱ्यात वैभवला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, त्याचा हा डेब्यू फारसा प्रभावी ठरला नाही. त्याने अनुक्रमे १४, १३ आणि १५ धावांच्या खेळी केल्या. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या शॉर्ट बॉलसमोर वैभव अडचणीत दिसला. आर्चरने त्याला दोनदा बाद केले. त्यामुळे त्याच्या फलंदाजीच्या तंत्रावरही काही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

या कामगिरीनंतर वैभववर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र, अवघ्या काही सामन्यांवरून १५ वर्षांच्या खेळाडूला लक्ष्य करणे योग्य नसल्याचे सिकंदर रझाने स्पष्ट केले आहे. आता त्याने केलेल्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.

नेमकं काय म्हणाला सिकंदर रझा ?

“वैभव अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. जर १५ वर्षांचा मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असेल, तर केवळ दोन-तीन सामन्यांनंतर त्याच्यावर टीका करणे योग्य नाही,” असे सिकंदर रझाने जिओस्टारवर म्हटले.

Maharashtra TimesMohammed Siraj DSP: सिराजच्या अंगावर पोलिसांची वर्दी, टीम इंडियात मात्र ‘मियाँ भाई’ची उणीव; नेमकं कारण काय?

“वैभवच्या आजूबाजूला अनेक सिनिअर खेळाडू आहेत. त्याला योग्य पद्धतीने सांभाळले आणि मार्गदर्शन केले, तर तो पिढीजात प्रतिभावान खेळाडू बनू शकतो. इतक्या कमी वयात त्याने केलेली प्रगती हीच एक असाधारण कामगिरी आहे. आजकाल इतक्या कमी वयात अशा गोष्टी पाहायला मिळत नाहीत. वैभव खास आहे आणि त्याला कसे हाताळले जाते, हे महत्त्वाचे ठरेल,” असेही रझाने सांगितले.

Maharashtra TimesIND vs PAK: भारत-पाकिस्तानचे दिग्गज पुन्हा आमनेसामने; एशियन लेजेंड्स लीगमध्ये कधी रंगणार महासंग्राम?

दरम्यान, अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध अवघ्या ८० चेंडूंत १७५ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर त्याला थेट इंग्लंड दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, तिथे त्याची बॅट फारशी चालली नाही. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत वैभव कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा