Meerabai Chanu Gold Medal News : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये सुवर्ण कामगिरी करत मीराबाई चानू हिने शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. भारतासाठी तिने यंदाच्या स्पर्धेत पहिले पदक जिंकत ती सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनायक राणे, ग्लास्गो : ‘भारताची वेटलिफ्टिंग क्वीन’, असे खणखणीत कामगिरीने कमावलेले टोपणनाव मीराबाई चानू हिने रविवारीही सार्थ ठरविले. ‘चॅम्पियन’ या बिरुदाला साजेशी कामगिरी करत या मणिपूरी कन्येने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅटट्रिक केली. यंदा ग्लास्गो येथे रंगलेल्या राष्ट्रकुलमध्ये ४८ किलो वजनी गटात एकूण १९० किलोंचा भार पेलत मीराबाईने जेतेपद राखले.
मीराबाईच्या निकालाबाबत किंवा जेतेपदाबाबत शंका नव्हती. स्पर्धेचे आयोजन होत असलेल्या एसइसी आर्माडिलो संकुलात सुरुवातीपासूनच उत्सुकता होती ती मीराबाई यंदा किती वजन उचलणार याची… ‘स्नॅच’मध्ये विक्रमी ८५ किलो तर ‘क्लिन अँड जर्क’मध्ये १०५ किलो वजन उंचावत तिने विश्वास सार्थ ठरविला. मीराबाईची कामगिरी एवढी जबदरदस्त होती की, तिच्या आणि रौप्यपदक विजेत्या नायजेरियाच्या रुथ असुको एनयाँगच्या कामगिरीत (एकूण १६८ किलो) २२ किलोंचा फरक होता. Zandu Kumar : कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये भारताला पहिलं पदक जिंकून देणाऱ्या झंडू कुमारचं खरं नाव वेगळंच, आई कमला देवीकडून खुलासा पदक सोहळ्यात मीराबाईचे डोळे पाणावले होते. तिला अश्रू रोखणेही कठीण झाले होते. या ऑलिम्पिक पदकविजेतीचा सुवर्णपदकापर्यंतचा प्रवासही सोपा नव्हता. ‘स्नॅच’ आणि ‘क्लीन अँड जर्क’ या दोन्ही शैलींतील पहिल्या प्रयत्नांत तिच्याकडून गडबड झाली होती. मात्र आत्मविश्वासाने परिपूर्ण मीराबाईने दणक्यात पुनरागमन करत खणखणीत कामगिरी करून दाखवली. कॉमनवेल्थ गेम्स २०१८, २०२२ आणि २०२६ मध्ये मीराबाई चानू हिने सुवर्ण पदकाची हॅट्रिक करत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. ‘स्नॅच’ आणि ‘क्लीन-अँड-जर्क’ अशा दोन्ही प्रकारांत मिळून एकूण १९० किलो वजन उचलले. मीराबाईचा विजय विशेष उल्लेखनीय ठरला, कारण तिने दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नायजेरियाच्या रुथ न्योंगपेक्षा २२ किलो अधिक वजन उचलले. Vaibhav Sooryavanshi : बेबी बॉस वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेला झोडलं, पठ्ठ्याचं शतक हुकलं, भारताकडून 193 धावांचे टार्गेट याआधी बिहारच्या झंडू कुमार याने पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचं खातं उघडलं होतं. त्यानंतर ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या ६० किलो गटात रौप्यपदक मिळवलं. मीराबाईच्या सुवर्णानंतर आता भारताकडे १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ३ पदकं झाली आहेत.उपलब्धींची यादी मोठीमीराबाई चानू हे नाव आता भारतीय वेटलिफ्टिंगचं समानार्थी झालं आहे. टोक्यो २०२० ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून तिने इतिहास रचला होता.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा