Irfan Pathan On Auqib Nabi: श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीला भारतीय संघात प्रथमच संधी मिळाली आहे. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे मिळालेल्या या संधीनंतर माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आकिबच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. आकिबची सर्वात मोठी ताकद त्याचा वेग नसून दुसरीच कला असल्याचे पठाणने सांगितले.
मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात प्रथमच स्थान मिळालेल्या जम्मू-काश्मीरच्या वेगवान गोलंदाज आकिब नबीबद्दल माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने मोठं विधान केलं आहे. नबीची सर्वात मोठी ताकद त्याचा वेग नसून, आघाडीच्या फलंदाजांना बचावात्मक खेळ करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून चूक करून घेण्याची क्षमता असल्याचं पठाणने सांगितलं. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर नबीला ही मोठी संधी मिळाली आहे. १५ ऑगस्टपासून श्रीलंकेत सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
२०१८ मध्येच ओळखली होती प्रतिभा
इरफान पठाणने २०१८ मध्ये श्रीनगर येथे झालेल्या ट्रायलदरम्यान प्रथमच आकिब नबीची गुणवत्ता ओळखली होती. त्यानंतर त्याने जम्मू-काश्मीरमधील अनेक युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केलं. पीटीआयशी बोलताना पठाण म्हणाला, “चेंडूला स्विंग मिळण्यासाठी १३५ किमी प्रतितास वेग आदर्श असतो. गोलंदाजाला उशिरा स्विंग मिळत असेल, तर तो अधिक धोकादायक ठरतो. आकिबची लय आणि गोलंदाजीची अॅक्शन पाहता तो सातत्याने १३३ ते १३५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो.”
पठाणच्या मते, वेगवान गोलंदाजी हा खेळाचा फक्त एक भाग आहे. खरा कस असा असतो की, गोलंदाज आघाडीच्या फलंदाजांना बचावात्मक फटके खेळण्यास भाग पाडतो का आणि त्यानंतर त्यांना बाद करण्याची संधी निर्माण करतो. “आघाडीच्या फलंदाजांना बचाव करतानाही बाद करण्याची क्षमता प्रत्येक गोलंदाजात नसते. आकिबमध्ये ही गुणवत्ता स्पष्टपणे दिसते,” असं पठाणने सांगितलं.
यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही आकिबनबीने आपल्या गोलंदाजीची झलक दाखवली होती. कर्नाटकविरुद्धच्या लढतीत त्याने केएल राहुल, मयांक अग्रवाल आणि करुण नायर यांच्यासह पाच फलंदाजांना बाद केलं. त्या कामगिरीच्या जोरावर जम्मू-काश्मीरने पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं. “केएल राहुलसारख्या अनुभवी फलंदाजालाही त्याने अडचणीत टाकलं. बचावात्मक खेळायला भाग पाडून विकेट मिळवण्याची त्याची क्षमता तेव्हा सर्वांनी पाहिली,” असंही पठाणने नमूद केलं.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा