Headlines

विविधतेत एकता भारताच्या डीएनएत; याचा उत्सव साजरा करा- सरसंघचालक:मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये 6 हजारांहून लोक जमले




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत म्हणाले, ‘विविधतेत एकता भारताच्या डीएनएमध्ये आहे. याचा स्वीकार करण्यासोबतच, सन्मान देत उत्सव साजरा केला पाहिजे.’ भागवत शनिवारी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनस्थित इन्फोसिस थिएटरमध्ये ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ला संबोधित करत होते. याचे आयोजन ‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ फोरमने केले. यात भारतीय-अमेरिकन समुदाय आणि विविध धर्मांच्या नेत्यांसह 6 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले. सरसंघचालक म्हणाले, ‘जेव्हा अमेरिकेची चर्चा होते तेव्हा बहुलवाद आणि भारताची चर्चा होते तेव्हा विविधतेत एकतेची चर्चा होते.’ स्वामी विवेकानंद यांचा उल्लेख करत ते म्हणाले, ‘प्रत्येक राष्ट्राचा एक संदेश, मिशन आणि नियती असते. भारताची नियती विविधतेत एकता समजून घेणे आणि वेळोवेळी जगाला याची जाणीव करून देणे ही आहे. आपण एक आहोत आणि विविधता या एकतेला सजवते.’ संकल्प: सोबत उभे राहण्याची आणि सेवेची जबाबदारी कार्यक्रमात अमेरिकेच्या 39 राज्यांतील व 853 शहरांतील लोक होते. 250 हून जास्त विद्यार्थी व 250 संघटना सहभागी झाल्या. 30 देशांच्या 180 धार्मिक नेत्यांनी ‘वन वर्ल्ड: वन ह्युमॅनिटी कॉल टू ॲक्शन’ची घोषणा केली. यात एखाद्या समुदायाला लक्ष्य केले गेल्यास त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा व मिळून सेवा करण्याचाही संकल्प समाविष्ट आहे. शिकवण: अमेरिका तुमची कर्मभूमी… एकनिष्ठ राहा भागवत यांनी भारतीयांना सांगितले, ‘आपण अमेरिकेत राहतो, कमवतो, त्यामुळे अमेरिकेप्रति प्रामाणिक असायला हवे. प्रवासी भारतीयांनी तिच्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. हे कर्तव्य बजावल्यानंतर त्यांना जन्मभूमी भारतासाठी काही करायचे असेल तर ते करू शकतात. भारताची अपेक्षा आहे की, त्याच्याकडून मिळालेली जीवनमूल्ये आचरणात आणावीत.’ परदेशात वेगळी भाषा: विरोधक; सहिष्णुता हेच हिंदुत्व: भाजप खा. कपिल सिब्बल म्हणाले, ‘परदेशात विविधतेची चर्चा, पण देशात ते खपवून घेतले जात नाही.’ खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, ‘जगासाठी वेगळे व आपल्या सदस्यांसाठी वेगळे बोलणे ही जुनी रणनीती आहे.’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सहिष्णुता हिंदूंच्या रक्तात आहे.’ भाजपच्या सरचिटणीस स्मृती इराणी म्हणाल्या, ‘भारत दाखवून देतो की विविधता आपली एकता अधिक खुलवते. हेच हिंदुत्व आहे.’



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत