![]()
वसमत शहरात एका भागात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचे फोटो एडीट करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणावर वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ३१ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलगी रस्त्याने जात असताना शहरातील शेख सबीर याने त्या मुलीला रस्त्यात थांबवून मला बोलायचे आहे असे म्हणत तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिचे फोटो एडीट करण्याची धमकी दिली. तसेच जातीवाचक शिवीगाळही केली. या प्रकारामुळे सदर मुलगी घाबरून गेली. सदर मुलगी घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर शेख सबीर याने त्या मुलीच्या आईसोबत मोबाईलवरून संपर्क साधून त्यांनाची मुुलीचे फोटो एडीट करून व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच सदर प्रकार कोणाला सांगितल्यास मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. मुलीच्या जिवाचे बरे वाईट होईल या भितीने त्यांनी सदर प्रकार कोणाला सांगितला नाही. मात्र त्याच्याकडून पुन्हा त्रास होण्याची भिती कायम होती. या प्रकारानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पिडीत मुलगी व तिच्या आईने शुक्रवारी ता. ३१ रात्री थेट वसमत शहर पोलिस ठाणे गाठले. यावेळी मुलीने महिला पोलिस उपनिरीक्षक एन. पी. राखोंडे यांच्याकडे तक्रार करून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तिला धिर देत तिच्या तक्रारीवरून शेख सबीर याच्या विरुध्द बाल लैंगिंग अत्याचर प्रतिबंधक कायदा तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून गुुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, महिला पोलिस उपनिरीक्षक एन. पी. राखोंडे पुढील तपास करीत आहेत.
Source link
वसमतमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी:एका तरुणावर गुन्हा दाखल, जातीवाचक शिवीगाळही केली
