Headlines

वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा मारली बाजी, इंग्लंडवर घरच्या मैदानावर 7 विकेटने मात


मुंबई : वुमन्स वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेटने पराभूत करत सातव्यांदा विजेतेपदावर नाव कोरले आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होत. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५०-४ धावा केल्या होत्या. वर्ल्ड कप इतिहासामधील चौथी सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र ऑस्ट्रेलिया संघाने १८ व्या ओव्हरमध्ये सहज हे आव्हान पूर्ण करत इतिहास रचला आहे. आठवेळा फायनल गाठणाऱ्या ऑस्ट्रेलिया सातवेळा विजय मिळवला आहे. तर आतापर्यंत फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला तीनवेळा हरवले आहे. या सामन्यात बेथ मुनी आणि फीबी लिचफील्ड यांची भागीदारी गेमचेंजर ठरली.

टी-२० फायनल २०२६ ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड

इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट हिने ५२ चेंडूत नाबाद ५८ धावांची लढवय्या खेळी केली होती. तर तिला फ्रेया केम्पने योग्य साथ देत अवघ्या २८ चेंडूत नाबाद ४४ धावांची आक्रमक खेळी करत भारताला १५० धावांपर्यंत पोहोचवले. या धावांचा पाठलाग करताना दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का दिला होता, जॉर्जिया व्होल हिला ८ धावांवर असताना लॉरेन बेलने आऊट केले. मात्र त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी फीबी लिचफील्ड आणि बेथ मुनी यांनी ६७ चेंडूत १०० धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. १३ व्या ओव्हरमध्ये लिचफील्डला ४८ धावांवर सोफी एक्लेस्टोनने बोल्ड केले. त्यानंतर बेथ मुनी ६४ धावांवर आऊट झाली. मात्र तोपर्यंत फार उशिर झाला होता. एलिस पेरीने नाबाद १३ धावा करत संघाला विजय मिळवून दिले.
Maharashtra TimesIND W vs BAN W : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघ जिंकूनही ‘हरला’, नेमकं काय चुकतंय? रविवारी शेवटची संधी
दरम्यान, सातवेळा ऑस्ट्रेलियाने २०१०, २०१२, २०१४, २०१८, २०२०, २०२३ आणि यंदा म्हणजेच २०२६ मध्ये एकूण ट्रॉफीवर नाव कोरले आहे. आस्ट्रेलिया संघाने २०१६ मध्येही फायनल गाठली होती. परंतु त्यावेळी वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्यानंतर जोरदार कमबॅक करत आस्ट्रेलियाने चार ट्रॉफी नावावर केल्या आहेत.
Maharashtra TimesWomen’s T20 WC Semi Final Scenario : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांची आता खरी परीक्षा, सेमी फायनलसाठी 2 विजय आवश्यक, पुढील मॅच कधी आणि कुठे?

वर्ल्डकपमध्ये भारताचा प्रवास

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सुरूवातीचे दोन सामने जिंकत झकास सुरूवात केली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेकडून पहिला झटका बसला आणि त्यानंतर बांगलादेशला हरवत कमबॅक केले होते. पण करो या मरो सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने भारत साखळी फेरीतच भारताचा प्रवास संपला.

इंग्लंड महिला (प्लेइंग 11): एमी जोन्स (WK), डॅनी वायट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट (C), ॲलिस कॅप्सी, हेदर नाइट, फ्रेया केम्प, डॅनिएल गिब्सन, शार्लोट डीन, लिन्सी स्मिथ, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग 1): जॉर्जिया व्होल, बेथ मुनी (WK), फीबी लिचफील्ड, एलिस पेरी, ॲशली गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला कॅरी, सोफी मोलिनक्स (C), किम गार्थ, लुसी हॅमिल्टन

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत