Headlines

वचन दिलं एक अन् झालं दुसरंच! गंभीरच्या टीम इंडियात अंतर्गत नाराजी, मोठ्या खेळाडूने फिरवली सूत्रं?


टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वकाही आलबेल नाही? गौतम गंभीर यांचे विश्वासू सहकारी रायन टेन डोशेट यांच्याबाबत एका रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. फील्डिंग कोचच्या भूमिकेपासून BCCIच्या निर्णयापर्यंत टीम इंडियामध्ये नेमकं काय घडतंय?

ryan ten doeschate unhappy in team india
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूमच्या आतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांना जे आश्वासन देऊन संघात आणलं होतं, ते बीसीसीआयने अजूनही पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे त्यांची भूमिका सध्या केवळ नावालाच उरली असून ते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. रायन टेन डोशेट यांना जेव्हा भारतीय संघात आणलं गेलं, तेव्हा त्यांना संघाचे ‘फील्डिंग कोच’ बनवलं जाईल असं स्पष्ट आश्वासन देण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतरही टी. दिलीप यांनाच फील्डिंग कोचच्या पदावर कायम ठेवण्यात आलं. त्यामुळे डोशेट यांच्याकडे नेमकी काय जबाबदारी आहे, याबाबत संघात संभ्रम निर्माण झाला आहे.

कोचिंग स्टाफमध्ये कामाची विभागणीच नाही

सध्याच्या भारतीय सपोर्ट स्टाफमध्ये कामाची विभागणी खूप वेगळी आहे. फलंदाजीसाठी सितांशु कोटक आणि स्वतः गौतम गंभीर आहेत. गोलंदाजीची जबाबदारी मोर्ने मोर्कल आणि साईराज बहुतुले सांभाळत आहेत. अशा वेळी टेन डोशेट यांना फील्डिंग कोचची जबाबदारी द्यायचं ठरलं होतं. पण टी. दिलीप अजूनही त्या जागेवर असल्यामुळे डोशेट यांच्याकडे कोणतीच मोठी आणि स्वतंत्र जबाबदारी उरलेली नाही.

Maharashtra TimesICC ODI World Cup New Format : 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये मोठा ट्वीस्ट! आता पहिल्याच टप्प्यात 2 संघांचे आव्हान संपणार, ICCचा नवा फॉरमॅट नेमका कसा?

टी. दिलीप यांना मिळाली मुदतवाढ

हा सगळा प्लॅन नेमका कुठे बिघडला, याचाही खुलासा झाला आहे. खरं तर, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टी. दिलीप आणि इतर काही स्टाफला बदललं जाणार होतं. पण ऐनवेळी भारतीय संघातील एका मोठ्या सीनियर खेळाडूने टी. दिलीप यांच्यासाठी बीसीसीआयकडे शब्द टाकला. या खेळाडूच्या आग्रहामुळे बीसीसीआयने दिलीप यांना आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आणि डोशेट यांचा पत्ता कट झाला.

दिग्गज प्रशिक्षकाचा वापरच होईना

टी. दिलीप संघात असल्यामुळे रायन टेन डोशेट यांच्यासारख्या उत्तम प्रशिक्षकाचा फायदा भारतीय संघाला घेता येत नाहीये. कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल जिंकवून देण्यात गंभीरसोबत डोशेट यांचा मोठा वाटा होता. पण आता एकाच कामासाठी दोन जण समोर आल्यामुळे कोचिंग स्टाफमध्ये अंतर्गत नाराजी वाढली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा