Headlines

रायगडमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात, दोन्ही बसचे प्रवासी जखमी


रायगडमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात एसटीचे चालक आणि वाहक यांच्यासह काही प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर महाड-विन्हेरे मार्गावरील अपघाताच्या घटनांवर चिंता व्यक्त केली जात आहे.

ST Bus Accident
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : महाड-विन्हेरे मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मागील महिन्यात एसटी बस आणि टेम्पोची धडक झालेल्या त्याच धोकादायक ठिकाणी सोमवारी सकाळी पुन्हा दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. कुर्ले घाटातील या अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

महाड आगारातील कृष्णवाडी-मुमूर्शी-महाड आणि मंडणगड आगारातील मंडणगड-लाटवण-कुंबळे-महाड या दोन एसटी बसची कुर्ले घाटातील धोकादायक ठिकाणी समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

बसचे चालक, वाहन आणि प्रवासी जखमी

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बसचे चालक आणि वाहक तसेच प्रतीक विनोद भोसले (वय १८), प्राची विठ्ठल सपकाळ (वय १७), प्रियंका गोपाळ सपकाळ (वय १३), तारा गंगाराम पवार (वय ५३), शीतल दामोदर वाघमारे (वय ४०) आणि सुरेखा जनार्दन भोसले (वय ५५), सर्व रा. मुमूर्शी, महाड, हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मागील वर्षी १५ ते १६ अपघात; यंदाचा चौथा अपघात

महाड-विन्हेरे मार्गावरील शिरगाव ते कोंड मालुसरे या पट्ट्यात मागील वर्षी पावसाळ्यात एसटीसह अन्य वाहनांचे तब्बल १५ ते १६ अपघात झाल्याची माहिती आहे. चालू वर्षातील हा एसटीचा चौथा अपघात असल्याने या मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यात याच ठिकाणी एसटी बस आणि टेम्पोची धडक झाली होती. त्यानंतरही या ठिकाणी ठोस सुरक्षा उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

एकाच ठिकाणी वारंवार अपघात होत असताना प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कुर्ले घाटातील अपघातप्रवण ठिकाणी रस्त्याची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, गतिरोधक तसेच इतर सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

दररोज एसटी बससह मोठ्या संख्येने वाहने या मार्गावरून धावत असताना अपघातांचे वाढते प्रमाण प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ अपघातानंतर पाहणी न करता अपघातप्रवण ठिकाणांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ठोस कृती आराखडा राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा