Kangana Ranaut On Sharmila Tagore : वंदे मातरम् च्या पहिल्या दोनच ओळी ठीक! शर्मिला टागोर यांच्या मतावर कंगना रणौतचा निशाणा; हिंदू-मुस्लिम विचारांतून बाहेर पडण्याचा सल्ला
चित्रपट, ओटीटी आणि टेलिव्हिजन अशा तिन्ही माध्यमांवर एकाच वेळी आदिनाथ कोठारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात आदिनाथ राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री यामी गौतम सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे चित्रपट निर्माते आनंद एल. राय यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत असून, बालाजी मोहन यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर कथा हिमांशु शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असणार आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ (दसऱ्याच्या मुहूर्तावर) थेट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद
झी मराठीवरील नवी मालिका
एका ब्रेकनंतर आदिनाथ पुन्हा एकदा मराठी छोट्या पडद्यावर काम करत असून, तो झी मराठी वाहिनीवरील एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला असून कोठारे व्हिजन अंतर्गत याची निर्मिती होत आहे.
एकीकडे ‘रामायण’ सारख्या भव्यदिव्य चित्रपटातील भरतच्या भूमिकेमुळे आदिनाथ चर्चेत आहे, तर दुसरीकडे ‘नई नवेली’ मधील त्याची भूमिका त्याच्या अभिनयातील वैविध्य अधोरेखित करणार आहे.
बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात
तर आदिनाथच्या एकूणच करिअरबद्दल बोलायचं झालं तर दिग्गज चित्रपट निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा असूनही आदिनाथनं के स्वतःच्यामेहनतीवर एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
बालकलाकार ते सहाय्यक दिग्दर्शक
आदिनाथच्या कारकिर्दीची सुरुवात अतिशय लहान वयात झाली. ‘माझा छकुला’ या लोकप्रिय चित्रपटातून त्याने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. या भूमिकेसाठी त्याला राज्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही काळ कॅमेऱ्यापासून दूर राहिलेल्या आदिनाथनं एम.बी.ए. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेड लावी जीवा’ या चित्रपटातून आदिनाथने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं.
